महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Saibaba Mukhdarshan : साईभक्तांसाठी आनंदाची बातमी, आजपासून साईबाबांचे मुखदर्शन सुरू - शिर्डी साईबाबांचे मुखदर्शन सुरू

आजपासून (16 डिसेंबर) सकाळी 6:30 ते रात्री 9:30 यावेळेत आरतीच्‍या वेळेव्‍यतिरिक्‍त साईबाबांचे मुखदर्शन (Saibaba Mukhdarshan start) व्यवस्था साई संस्थानकडून (Sai Sansthan) सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

saibaba
शिर्डी साईबाबा

By

Published : Dec 16, 2021, 5:38 PM IST

Updated : Dec 16, 2021, 6:54 PM IST

शिर्डी(अहमदनगर) -साईबाबांच्या दर्शनासाठी (Saibaba Darshan Shirdi) येणाऱया भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून (16 डिसेंबर) सकाळी 6:30 ते रात्री 9:30 यावेळेत आरतीच्‍या वेळेव्‍यतिरिक्‍त साईबाबांचे मुखदर्शन (Saibaba Mukhdarshan start) व्यवस्था साई संस्थानकडून (Sai Sansthan) सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया देताना साईभक्त
  • आजपासून मुखदर्शनाला सुरुवात -

कोरोनामुळे 5 एप्रिल 2021 पासून साईबाबांचे मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आले होते. परंतु, राज्‍य शासनाने 7 ऑक्‍टोंबर 2021 पासून काही अटी-शर्तीवर धार्म‍िकस्‍थळे खुली करण्‍याचे आदेश दिले होते. त्‍यानुसार सुमारे 15 हजार भाविकांना ऑनलाईन पासद्वारे साई दर्शन व्‍यवस्‍था सुरू करण्‍यात आली. त्‍यानंतर 17 नोव्‍हेंबर 2021 पासुन ऑफलाईन पासद्वारे 10 हजार भाविकांची अशी एकूण 25 हजार भाविकांची दर्शन व्‍यवस्‍था सुरू करण्‍यात आली. प्रति तास 1150 भाविकांना दर्शनासाठी सशुल्‍क व निशुल्‍क ऑफलाईन पासेस देण्‍यात येतात. त्‍यामुळे गर्दीच्‍या काळात अनेक भाविकांना दर्शन पास मिळत नसल्‍याने साईभक्‍तांकडून वारंवार मुखदर्शन सुरू करण्‍याची मागणी होत होती.

  • शिर्डीत नागरिकांची गर्दी वाढली -

नाताळ व नववर्ष असल्‍याने भाविकांची होणारी संभाव्‍य गर्दी व साईभक्‍तांची मागणी लक्षात घेऊन 16 डिसेंबरपासून सकाळी 6:30 ते रात्री 9:30 या वेळेत (आरतीच्‍या वेळे व्‍यतिरिक्‍त) मुखदर्शन गेट सुरू राहील. तरी सर्व साईभक्‍तांनी कोरोनाचे सर्व मार्गदर्शक नियमांचे पालन करुन साईंच्या मुखदर्शनाचा लाभ घ्‍यावा. तसेच सर्व साईभक्‍तांनी व ग्रामस्‍थांनी याबाबत संस्‍थानला सहकार्य करावे, असे आवाहन साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केले.

Last Updated : Dec 16, 2021, 6:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details