अहमदनगर - साईबाबांच्या जीवनावर साईभक्त असलेल्या हेमाडपंथांनी साई चरित्र लिहिले आहे. त्याची पहिली पत्र 1930 साली छापण्यात आली होती. त्या नंतर साईचरित्राच्या मराठी भाषेत छत्तीस प्रती छापण्यात आल्या आहेत. त्या सर्व प्रती साई संस्थानकडे आहेत. त्या प्रती आणि इतर कागदपत्रे सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत सादर करणार असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्यकार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांसोबत होणाऱ्या बैठकीत साई चरित्राच्या प्रती सादर करणार
साई संस्थानच्या रेकॉर्डमधून साई चरित्राच्या प्रती गायब असल्याची चर्चा होत होती. त्यावर मुगळीकर यांनी स्पष्टीकरण देऊन साई संस्थानच्या रेकॉर्डमधून प्रती गायब नसल्याचे सांगितले.
हेही वाचा - साई जन्मभूमी वाद: बंदला शिर्डीकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद, साईमंदिर दर्शनासाठी खुले
शिर्डीमध्ये ग्रामस्थांनी बंद ठेवल्याने साईभक्तांना खानपानचे सामान मिळणे दुरापस्त झाले होते. केवळ साई संस्थानच्यावतीने दिल्या जाणाऱ्या नाष्ट्याच्या पाकिटाचा आधार त्यांना होता. त्यामुळे साई संस्थानने रविवारी नाष्ट्याच्या पन्नास हजार अतिरीक्त पाकिटांची व्यवस्था केली.
साई संस्थानच्यावतीने चालवण्यात येणारे प्रसादालय सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत सुरू असते. रविवारी मात्र, हे प्रसादालय रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. साईभक्तांना दर्शन रांगेत मोफत चहा बिस्कीटे संस्थानच्यावतीने देण्यात येत आहेत. शिर्डी बंदच्या काळात साई भक्तांना कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी संस्थानकडून घेण्यात आली आहे, अशी माहिती संस्थानचे कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी दिली.