महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

7 ऑक्‍टोबरपासून साई मंदिर दर्शनासाठी खुले होणार; दररोज 15 हजार भक्तांनाच प्रवेश - धार्म‍िकस्‍थळे खुले

५ एप्रिल २०२१ पासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते. २४ सप्‍टेंबर २०२१ रोजी राज्‍य शासनाने ७ ऑक्‍टोबर २०२१ पासून घटस्‍थापनेच्या मुहुर्तावर महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार ७ ऑक्‍टोबर काकड आरतीनंतर समाधी मंदिर दर्शनाकरीता खुले करण्‍यात येणार असून सकाळी ६ ते रात्री १० यावेळेत मंदिर खुले राहणार आहे.

साईबाबा
साईबाबा

By

Published : Oct 5, 2021, 3:51 PM IST

Updated : Oct 5, 2021, 4:02 PM IST

शिर्डी (अहमदनगर) -राज्‍य शासनाने दिनांक ०७ ऑक्‍टोबर २०२१ पासून महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिलेले आहेत. त्‍यानुसार श्री साईबाबा समाधी मंदिरात दररोज १५ हजार साईभक्‍तांना दर्शनाचा लाभ दिला जाणार असून १० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया, ६५ वर्षावरील व आजारी व्‍यक्‍ती तसेच मास्‍क न वापरणाऱ्या साईभक्‍तांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली आहे.

7 ऑक्‍टोबरपासून साई मंदिर दर्शनासाठी खुले होणार
असा मिळेल प्रवेश

५ एप्रिल २०२१ पासून साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते. २४ सप्‍टेंबर २०२१ रोजी राज्‍य शासनाने ७ ऑक्‍टोबर २०२१ पासून घटस्‍थापनेच्या मुहुर्तावर महाराष्‍ट्रातील सर्व धार्म‍िकस्‍थळे खुले करण्‍याचे आदेश दिलेले आहेत. त्यानुसार ७ ऑक्‍टोबर काकड आरतीनंतर समाधी मंदिर दर्शनाकरीता खुले करण्‍यात येणार असून सकाळी ६ ते रात्री १० यावेळेत मंदिर खुले राहणार आहे. दिवसभरात १५ हजार भाविकांना दर्शनाकरीता प्रवेश दिला जाणार आहे. यापैकी १० हजार ऑनलाइन पास (५ हजार सशुल्‍क व ५ हजार निशुल्‍क) असणार आहे. प्रत्‍येक तासाला ११५० साईभक्‍तांना मंदिरात प्रवेश दिला जाईल. साईभक्‍तांना दर्शनाकरीता online.sai.org.in या संकेतस्‍थळावर ऑनलाइन दर्शन पासेची बुकींग करावी लागेल.

अशी असेल पासेसची प्रक्रिया

सकाळी ५ ते रात्री १० यावेळेत संस्‍थानचे साई आश्रम १, साईबाबा भक्‍तनिवास्‍थान (५०० रुम), व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान, श्रीराम पार्कींग, साई कॉम्‍प्‍लेक्‍स व शिर्डी बसस्‍थानक येथील दर्शन पास काऊंटरवरुन दिले जातील. तसेच प्रत्‍येक आरतीकरीता एकूण ८० साईभक्‍तांना आरतीसाठी प्रवेश देण्‍यात येईल. त्‍यापैकी प्रत्‍येक आरतीला प्रथम येणाऱ्या शिर्डी ग्रामस्‍थांना १० पासेस देण्‍यात येतील. ग्रामस्‍थांना १० आरती पासेस हे साईउद्यान निवासस्‍थान येथून तर दर्शनाचे पासेस मारुती मंदिराशेजारील १६ गुंठे शताब्‍दी मं‍डप येथील काऊंटरवर दिले जाणार आहे. ग्रामस्‍थांना मतदान ओळखपत्र व आधारकार्ड शिवाय मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.ऑनलाइनव्‍दारे २० आरती पासेस, महत्‍वाचे व अतिम‍हत्‍वाचे मान्‍यवर आणि देणगीदार साईभक्‍तांकरीता ५० आरती पासेस दिले जातील. सशुल्‍क दर्शन पासेस गेट नंबर १ शेजारील दर्शनरांगेतील पास वितरण काऊंटरवरुन दिले जातील.

'या' नियमांचे पालन करणे अनिवार्य

सर्व साईभक्‍तांनी दर्शनाकरीता जाताना मास्‍कचा वापर करावा. सामाजिक अंतराचे ६ फुट अंतर ठेवुन आखणी करण्यात आलेले आहे. मार्कींग प्रमाणे पालन करावे. मास्‍कचा वापर न करण्‍याऱ्या साईभक्‍तांना तसेच १० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया, ६५ वर्षावरील व्‍यक्‍ती व आजारी व्‍यक्‍तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय मंदिरात फुले, हार व इतर पूजेचे साहित्‍य नेण्‍यास मनाई आहे. तसेच गर्दी टाळण्‍याकरीता सुरुवातीचे काही दिवस दर गुरुवारची नित्‍याची पालखी बंद राहील. याबरोबरच मंदिरातील साई सत्‍यव्रत पुजा, अभिषेक पुजा, ध्‍यान मंदिर व पारायण हॉल बंद राहतील. दर्शनासाठी भाविकांना गेट नंबर २ मधून प्रवेश दिला जाणार आहे. व्‍दारकामाई मंदिरातून समाधी मंदिरामधून दर्शन घेऊन गुरुस्‍थान मंदिर मार्गे ४ व ५ नंबर गेटव्‍दारे बाहेर पाठविले जाईल. यासह सर्व कोरोना नियमांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे.

हेही वाचा -शाळा सुरू होताच दोन विद्यार्थ्यांची 'फ्री स्टाईल' हाणामारी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Last Updated : Oct 5, 2021, 4:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details