महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीतील वाहतूक शाखा बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी; ग्रामसभा घेत मांडली भूमिका - अवैध कारवाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करा

आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठिकाण असलेल्या शिर्डीला देशभरातून भाविक आपल्या खासगी वाहने घेवून साई दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र शिर्डीच्या नाक्यावर वाहतूक पोलीस काहीना काही कारण काढत साईभक्तांकडून कधी दंडापोटी तर कधी चिरमिरी घेवून लुट करतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

शिर्डीतील ग्रामसभा
शिर्डीतील ग्रामसभा

By

Published : Feb 1, 2022, 2:36 AM IST

Updated : Feb 1, 2022, 2:51 AM IST

शिर्डी -शिर्डीला खासगी वाहनाने येणाऱ्या भाविकांना वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून कधी दंडापोटी तर कधी चिरीमीरी घेवून त्रास दिल्या जात असल्याचे सांगत आता शिर्डीकर एकवटले आहे. ग्रामस्थांनी आता वाहतूक शाखाच बंद करण्याची मागणी केली आहे.

ग्रामसभेनंतर ग्रामस्थांनी दिलेल्या प्रतिक्रिया
आंतरराष्ट्रीय दर्जाचे ठिकाण असलेल्या शिर्डीला देशभरातून भाविक आपल्या खासगी वाहने घेवून साई दर्शन घेण्यासाठी येतात. मात्र शिर्डीच्या नाक्यावर वाहतूक पोलीस काहीना काही कारण काढत साईभक्तांकडून कधी दंडापोटी तर कधी चिरमिरी घेवून लुट करतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. यामुळे शिर्डीचे नाव बदनाम होत असल्याने वाहतुक पोलीसांच्या कार्यपध्दतीचा निषेध व्यक्त करत पुढील भुमिका ठरविण्यासाठी शिर्डीतील ग्रामस्थ एकवटले होते. या बैठकीत नव्याने वाहतूक शाखेचा पदभार स्विकारलेले पोलीस निरीक्षक स्वत: उपस्थित होते. त्यांनी यावेळी ग्रामस्थांच्या भावना जाणून घेतल्या. शिर्डीकरांची आजची संतप्त प्रतिक्रिया जाणून घेत यापुढे वाहतूक शाखेतील कर्मचाऱ्याने भाविकांनाची गाडी अडवून पैसे घेतल्याची तक्रार कुठलाही भाविकांनी दिली, तर तातडीने त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही शिर्डी पोलीस शाखेचे पोलीस निरीक्षक हिराला पाटील यांनी ग्रामस्थांना दिली आहे.
Last Updated : Feb 1, 2022, 2:51 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details