अहमदनगर - जगभर थैमान घेतलेल्या कोरोणा विषाणूमुळे शुक्रवारी राज्यात अनेक ठिकाणी रंगपंचमी उत्सवा रद्द करण्यात आले. मात्र, साईबाबांच्या शिर्डीत रंगपंचमीनिमित हजारों भक्तांनी रंगपंचमीचा आनंद घेतला. यावेळी साईबाबांच्या मूर्तीला तसेच साई समाधीलाही रंग लावण्यात आला.
शिर्डीत भाविकांनी लुटला रंगपंचमीचा आनंद द्वारकामाई मंदिरापासून साईबाबांच्या रथाची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी साईबाबांना रंगीत वस्त्र परिधान करून साईबाबांची आरती तसेच पुजा करण्यात आली. यावेळी भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती.
शिर्डीतील रंगपंचमी -कोरोनाला रोखण्यासाठी पुण्यातील रिक्षाचालकाची भन्नाट शक्कल
आपल्या जीवनात सुख आणि समाधान रहावे म्हणून भाविक रंगपंचमीला साईबाबांना कृष्ण अवतार मानतात आणि रंगपंचमी साजरी करतात. येथील रंगपंचमीचे खास वैशिष्ट्य म्हणजे साईची रंगबेरंगी रथ यात्रा निघते. या रथयात्रेमध्ये हजारो भक्त आणि शिर्डी ग्रामस्थ सहभागी होऊन आनंद साजरा करतात. आपल्या जीवन काळी साईबाबा स्वत: लहान मुलांसोबत द्वारकामाई आणि चावडीत रंगपंचमी खेळायचे. ही परंपरा आजही साईबाबा संस्थानसमवेत शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी कायम ठेवली आहे. स्वत: साईबाबा साई कुठल्या ना कुठल्या रुपात भक्तांसोबत रंगपंचमी खेळतात, अशी भक्तांची श्रद्धा आहे.