महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ahmednagar Crime : पोलीस उपनिरीक्षकावर फायरींग करून राजस्थानातून पळालेला कुख्यात गुंड शिर्डीत जेरबंद - कमल राणा

राजस्थान पोलिसांवर गोळी झाडून शिर्डीत दाखल झालेल्या, संशयितांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. शिर्डी पोलिस आणि जयपूर पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत कमलसिंग उर्फ कमल राणा याच्यासह पाच संशयितांना पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे.

ahmednagar crime
कुख्यात गुंड शिर्डीत जेरबंद

By

Published : Jun 19, 2023, 7:30 PM IST

माहिती देताना संदीप मिटके

अहमदनगर :शिर्डीतील साईंची नगरी आता मोस्ट वॉंटेड गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनल्याचे समोर आले आहे. राजस्थान मधील कमलसिंग उर्फ कमल राणा या कुख्यात टोळीतील पाच जणांना शिर्डी पोलिस आणि जयपूर पोलिसांनी संयुक्तिकरित्या सर्च ऑपरेशन राबवून शिर्डीतील एका हॉटेलमधून रविवारी मध्यरात्री जेरबंद केले आहे.



बक्षीस केले जाहीर : राजस्थान आणि मध्यप्रदेश बॉर्डरवर धुमाकूळ घालणाऱ्या कमलसिंग राणा या कुख्यात टोळीने, तीन दिवसांपूर्वी मध्यप्रदेश राज्यातील निमज येथे राजस्थानच्या एका पोलिस उपनिरिक्षकावर गोळी झाडली होती. तसेच हे आरोपी पोलीस अधिकाऱ्याची पिस्तूल घेवून फरार झाले होते. तेव्हापासूनच राजस्थान आणि मध्यप्रदेश पोलीस या टोळीच्या मागावर होते. या कुख्यात टोळी विरोधात राजस्थानमध्ये 37 हून अधिक गुन्हे दाखल आहे. या टोळी संदर्भात माहिती देणाऱ्याला राजस्थान पोलिसांनी 50 हजार व मध्यप्रदेश पोलिसांनी 20 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.



हॉटेलमध्ये छापा टाकून ताब्यात घेतले : राजस्थान पोलिसांना गुप्त खबऱ्याच्या माहितीवरून, सदर आरोपी शिर्डीतील एका हॉटेलमध्ये आश्रयाला असल्याचे कळताच शिर्डी पोलीस आणि राजस्थान पोलिसांनी शिर्डीच्या क्यूआरटी टीमला सोबत घेतले. संयुक्तरित्या सापळा लावत शिर्डीतील एका हॉटेलमध्ये रविवारी मध्यरात्री छापा टाकून पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. रविवारी रात्री उशिरा कमलसिंग राणा टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. मात्र रात्रीचा वेळ आणि शिर्डी ते राजस्थान या आरोपीना घेवून जाण्याचा प्रवास अडचणींचा असल्याने, या टोळीला रात्रभर शिर्डी पोलीस ठाण्याच्या जेलमध्येच ठेवण्यात आले होते.

आरोपींना राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिले : आज दुपारी शिर्डी पोलिसांनी या पाच आरोपींना राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या आरोपीना घेवून राजस्थान पोलीस आता रवाना झाले आहे. दरम्यान, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, शिर्डी पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, शिर्डी पोलीस ठाण्याचे कर्मचारी, तसेच शिर्डीतील क्यूआरटी टीमच्या जवानांच्या सहकार्याने कमलसिंग राणा या टोळीला पकडण्यात आम्हाला यश आले असल्याचे राजस्थान पोलिसांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा -

  1. Pune Crime news कर्नाटक येथील तोतया मेजरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या युनिफॉर्मसह कागदपत्रेदेखील तयार केले बनावट
  2. Kolhapur Murder Case 75 हजारांची सुपारी देऊन बापाने मुलाला संपवलं काही तासांतच खुनाचा प्रकार उघडकीस
  3. Conversion Through Gaming App ठाणे न्यायालयाकडून आरोपी शाहनवाझ खानला तीन दिवसाची ट्रान्झिट रिमांड

ABOUT THE AUTHOR

...view details