महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साईभक्तांची आर्थिक लूट करणारी टोळी गजाआड; शिर्डी पोलिसांच्या कारवाईत 12 अटकेत - शिर्डीत साई दर्शनासाठी

देशभरातून दररोज हजारो साईभक्त शिर्डीत येत असतात.साईभक्तांना चांगली सेवा देण्याच्या नावाखाली साईभक्तांची आर्थिक लुट केली जात असल्याच्या घटना नेहमीच शिर्डीत घडत असतात.

साईभक्तांची आर्थिक लूट करण्यारी टोळी गजाआड

By

Published : Jul 9, 2019, 7:18 PM IST

अहमदनगर - शिर्डीत साई दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना ठगणाऱ्या कमिशन एजंटांना पोलिसांनी गजाआड केले. कमिशन मिळवण्यासाठी साईभक्तांची अनेकदा लुट होत असल्याने दंडात्मक कारवाई न करता थेट फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी 12 कमीशन एजंटांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

साईभक्तांची आर्थिक लूट करण्यारी टोळी गजाआड

देशभरातून दररोज हजारो साईभक्त शिर्डीत येत असतात. पहिल्यांदा आलेल्या भक्तांना मंदीर कुठे आहे, रूम कुठे घ्यावी, पुजा साहित्य आणि प्रसाद कुठे घ्यावा याबाबत काहीही माहीती नसते. साईभक्तांना चांगली सेवा देण्याच्या नावाखाली साईभक्तांची आर्थिक लुट केली जात असल्याच्या घटना नेहमीच शिर्डीत घडत असतात. शेकडो तरूणांनी हा कमिशन एजंटचा धंदा सुरू केला आहे. कमी वेळेत जास्त पैसे मिळत असल्याने या एजंटांच्या मोठ्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत.

अनेकदा तक्रार केल्यानंतर काही एजंटांवर पोलीस दंडात्मक कारवाई करत होती. परंतू पोलिसांनी यावेळी साईभक्तांची फसवणूक करून लुटणाऱ्या 12 कमिशन एजंटांना थेट गजाआड केले आहे. अशाप्रकारची धडक कारवाई झाल्याने इतर कमिशन एजंटांनीही धसका घेतल्याची चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details