अहमदनगर- शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी उद्या २९ एप्रिल रोजी मतदान होत आहे. या मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली आहे. मतदारसंघात एकून १५ लाख ८४ हजार ३०३ मतदार आहेत. यात ८ लाख २१ हजार ४०१ पुरुष, ७ लाख ६२ हजार ८३२ महिला तर इतर ७० मतदार आहेत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघात १७१० मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रांवर १० हजार २६० अधिकारी, कर्मचारी आणि १५९ क्षेत्रीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर मतदानाच्या कालावधीत जिल्ह्यात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदार संघातील १७४ मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करण्यात येणार असून इतर १०१ मतदान केंद्रांवर सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.
विधानसभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे ९ मतदान केंद्र सखी मतदान केंद्र म्हणून निवडण्यात आले असून येथील सर्व अधिकारी, कर्मचारी हे महिला असणार आहेत. लोकसभा निवडणूकीची प्रशासकीय पातळीवर संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. आज निवडणूकीसाठी नेमण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना विधानसभा क्षेत्रानुसार मतदानाचे साहित्य वाटप केल जात आहे.
सर्व कर्मचारी दुपारपर्यंत आप आपल्या मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत. यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने मतदान केंद्रावर मतदारांसाठी पिण्याचे पाणी, प्रथमोपचार व इतर आवश्यक सुविधा ठेवण्यात आल्या आहेत. मतदानाच्या दिवशी पहाटे ५.३० वाजता उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत मॉकपोल घेण्यात येणार असून ७ वाजता मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे.
पोलीस बंदोबस्त
१ एसपी