महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अपुऱ्या सुविधांमुळे शिर्डी विमानतळावर तांत्रिक अडचणी - Shirdi International Airport news

2018 पासून शिर्डीतील विमानसेवेला सुरुवात झाली होती. उद्घाटन सोहळ्यात दोन महिन्यांत नाईट लँडींगसह सर्व सुविधा पूर्ण करण्याची ग्वाही महाराष्ट्र विमानतळ कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली होती. त्यानंतर दोन वर्ष उलटूनही नाईट लँडींग सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. यामुळे विमानांना व्हिजिबिलिटीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शिर्डी विमानतळ
शिर्डी विमानतळ

By

Published : Feb 11, 2020, 7:00 PM IST

अहमदनगर:देश-विदेशातील साईभक्तांच्या सोयीसाठी शिर्डी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात आले. मात्र, या विमानतळवर लँडींग आणि टेकऑफसाठी लागणारी उच्च दर्जाची यंत्रणा पूर्णपणे कार्यान्वित नसल्याने अडचणी येत आहेत.

अपुऱ्या सुविधांमुळे शिर्डी विमानतळावर तांत्रिक अडचणी


2018 पासून शिर्डीतील विमानसेवेला सुरुवात झाली होती. उद्घाटन सोहळ्यात दोन महिन्यांत नाईट लँडींगसह सर्व सुविधा पूर्ण करण्याची ग्वाही महाराष्ट्र विमानतळ कंपनीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली होती. त्यानंतर दोन वर्ष उलटूनही नाईटलँडींग सुविधा उपलब्ध करण्यात आलेली नाही. यामुळे विमानांना व्हिजिबिलिटीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हेही वाचा - भारतीय लष्कराच्या कारवाईत तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा!

धुके किंवा खराब वातावरण असल्यास विमान कंपन्यांना अचानकपणे विमानांचे लँडींग दुसरीकडे करावे लागत असल्याचे प्रकार वारंवार होत आहेत. यामुळे विमान कंपन्या आणि प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांसाठी टर्मिनल इमारत सुध्दा कमी पडत आहे. त्यामुळे त्याचे विस्तारीकरण लवकरात लवकर होण्याची गरज आहे.

शिर्डी विमानतळाला देशभरातून प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. सध्या दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, इंदुर या ठिकाणांहून शिर्डीत दररोज अठ्ठावीस विमानांची ये-जा होते. मुंबई, पुणे, नागपूरनंतर शिर्डी विमानतळ चौथ्या स्थानावर आहे. असे असतानाही शिर्डी विमानतळाकडे सरकार दुर्लक्ष करत आहे.

नाशिक येथील विभागीय बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शिर्डी विमानतळावरील नाईट लँडींग आणि टर्मिनल इमारतीच्या कामाला पैसा कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली होती. मात्र, त्याची पूर्तता झालेली नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details