शिर्डीसाईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचा Board of Trustees of Saibaba Sansthan वतीने ठराव करत साईमंदिरात Sai Mandir Shirdi भाविकांना हार फुल प्रसाद घेवुन जाण्यास बंदी Temple closed for devotees घालण्यात आली आहे. या बंदी विरोधात आता शिर्डीत आंदोलने सुरू झाले आहे. साईबाबांच्या मंदिरात भाविकांना हार फुल प्रसाद पूर्वीप्रमाणे घेवुन जावून द्यावा ही मागणी घेवुन कोपरगाव येथील सामजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी गेल्या काही दिवसापूर्वी आंदोलन केले होते. आता पुन्हा हीच मागणी घेवुन शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर कोते यांनी साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरासमोर उपोषण सुरू केले आहे.
साई मंदिरात फुल प्रसाद आणि पुजा साहित्य घेवून जाण्यावर बंदीकोरोना निर्बंधाच्या आधी साई मंदिरात हार फुल प्रसाद घेवुन भाविकांना जात येत होते. मात्र कोरोणा आल्याने राज्यातील सर्वच मंदिरांचे कावड भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते. त्यानंतर हाळूहाळू कोरोनाचे नियम शिथील झाल्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानंतर साईमंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले. साई दर्शनासाठी भाविकांनाची संख्या व मर्यादा देखिल हटवली गेली. सर्व काही सुरुळीत झाले. मात्र साई मंदिरात फुल प्रसाद आणि पुजा साहित्य घेवून जाण्यावर बंदी कायमच आहे. तसे निर्बधांचे फलक देखिल साई मंदिराच्या प्रवेशव्दारावर लावण्यात आले आहे.
गेल्या तीन दिवसा पासुन उपोषण सुरू साई मंदिरात सर्व काही सुरु झाले आहे. मात्र पुजा साहित्य बंद ठेवण्यात आले. देश विदेशातून भाविक साईबाबांचे दर्शन आणि फुल प्रसाद चढवण्यासाठी येतो. मात्र येथे त्यांना फुल प्रसाद बंदीच्या नियमांना सामोरे जावे लागते. गुलाबची गुच्छ घेवून भाविक दर्शन रांगेत गेला तर त्याच्याकडील पुजा सामान संस्थानच्या सुरक्षा रक्षाकाकडून काढून घेतले जाते. त्यामुळे भाविकांस साईदर्शनाचे पुरेपुर समाधान मिळत नाही. साई मंदिरात फुल हार बंदी असल्याने परिसरातील फुल उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिक यामुळे अडचणीत सापडला आहे. आधीच कोरोनाच्या दोन वर्षात शिर्डीचे आर्थिक समीकरण बिघडले असून त्यात अशा बंदी व नियमांमुळे अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे साई संस्थानच्या या निर्णया विरोधात गेल्या काही दिवसांनापूर्वी कोपरगाव येथील सामजिक कार्यकर्ते संजय काळे तबल्ल 16 किलो मिटर पाई चालत डोक्यावर फुलांनी भरलेली कटोरी घेवुन साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरासमोर फुले वाहून आंदोलन केले होते. पुन्हा हीच मागणी घेवुन शिर्डीतील सामजिक कार्यकर्ते दिगंबर कोते यांनी साईबाबांच्या द्वारकामाई मंदिरासमोर गेल्या तीन दिवसा पासुन उपोषण सुरू केले असुन आज या उपोषणाचा चौथा दिवस असल्याचे कोते म्हणाले आहे.