महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sai Baba Devotees Against Bhide: साईबाबांविषयी संभाजी भिडेंचे वादग्रस्त वक्तव्य; शिर्डीत 'एफआयआर' दाखल - भिडेंनी केली साईंची आरती

महात्मा फुले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यानंतर आता कोट्यवधी भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांबद्दलही संभाजी भिडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे शिर्डीकरांसह भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. भक्तांच्या भावना आणि मागणीनंतर साईबाबा संस्थानने संभाजी भिडे यांच्या विरोधात एफआयआर दाखल केला असून त्यानुसार पोलिसांनी संभाजी भिडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Sai Baba Devotees Against Bhide
संभाजी भिडे विरुद्ध शिर्डीकरांसह भाविक आक्रमक

By

Published : Jul 31, 2023, 7:29 PM IST

Updated : Jul 31, 2023, 9:03 PM IST

संभाजी भिडेंविषयी साईभक्तांच्या आक्रमक प्रतिक्रिया

अहमदनगर (शिर्डी) : मनोहर कुलकर्णी हे आपले खरे नाव बदलून संभाजी भिडे म्हणून वावरतात आणि स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणवून घेतात. त्यांनी नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. आता शिर्डीच्या साईबाबांविषयी वादग्रस्त व्यक्तव्य करण्यामध्येही भिडेंची भर पडली आहे. संभाजी भिडेंचा निषेध करण्यासाठी आज (सोमवारी) शिर्डीकर एकवटले. शिर्डीच्या साई मंदिराजवळील मारुती मंदिर परिसरात ग्रामस्थांनी एकत्र येत साई संस्थानच्या प्रशासकीय इमारतीत जाऊन साई संस्थानच्या उपकार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. साईबाबांची बदनामी करणाऱ्या संभाजी भिडेंविरोधात साई संस्थानने पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. यानंतर शिर्डीच्या ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात जाऊन उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांनाही निवेदन दिले आहे.


साईबाबांना मुस्लिम ठरविण्याचे कारस्थान :'सबका मालिक एक'चा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षाकाठी कोट्यवधी भाविक येतात. गेल्या काही वर्षांपासून साईबाबांना मुस्लिम ठरविण्याचे आणि त्यांची बदनामी करण्याचे जणू कारस्थानच रचले जात आहे; मात्र भक्तांच्या भक्तीत कोणतीही कमी आलेली दिसून येत नाही. आजही भिडेंच्या वक्तव्याबद्दल साईभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भिडेंनी केली साईंची आरती :देशाच्या राष्ट्रपतींपासून ते सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींपर्यंत सर्वच जण साईभक्त आहेत. इतकेच नाही तर सांगलीच्या साई मंदिरात जात काही दिवसांपूर्वी संभाजी भिडेंनी आरती केल्याचे फोटोही व्हायरल होत आहेत. त्यामुळे आता भिडेंना साईचे फोटो घरातून, देव्हाऱ्यातून काढून फेकण्याची अवदसा का सुचली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.



सोलापुरात भिडेंविरुद्ध निषेध आंदोलन : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडेंनी महात्मा गांधींचे वडील मुस्लिम जमीनदार होते, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्यांच्याविरुद्ध राज्यभर निषेध सुरू आहे. सोलापुरातील मोहोळ तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून भिडेंच्या पुतळ्याचे खाली मुंडी, वर पाय करत निषेध आंदोलन करण्यात आले.

तर राज्यभर आंदोलन करू: संभाजी भिडेंच्या अमरावतीच्या सभेतील खळबळजनक व्यक्तव्याचे अमरावतीत संतप्त पडसाद उमटले आहेत. संभाजी भिडे यांना अटक न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा काँग्रेसने इशारा दिला आहे. संभाजी भिडे यांच्या वक्तव्याची पोलिसांकडे व्हिडिओ व ऑडिओ क्लिप उपलब्ध नाही. अमरावती पोलीस व गुप्तचर यंत्रणा का गप्प आहे, असा आरोप काँग्रेसचे नंदकिशोर कुयटे यांनी केला आहे.

हेही वाचा:

  1. Bhide on Mahatma Gandhi Controversy statement : आंबा, टिकली ते गांधी, फुले- संभाजी भिडेंनी अनेकवेळा केली आहेत वादग्रस्त विधाने
  2. Youth Congress Protest: संभाजी भिडेंविरोधात युवक काँग्रेस आक्रमक; अटकेची मागणी
  3. Sambhaji Bhide : भाजपात हिम्मत असेल तर सरकारी कार्यालयातील महात्मा गांधींचे फोटो....; महिला आमदाराचे थेट आव्हान
Last Updated : Jul 31, 2023, 9:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details