अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना विखे समर्थकांनी मदत न करण्याचा सूर आवळल्याने कांबळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. कांबळे यांना संगमनेर आणि अकोले तालुक्यातून थोरात आणि पिचड यांचे बळ मिळाले असले तरी, त्यांचे 'होम टाऊन' असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातच त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
शिर्डी मतदारसंघ : विखे समर्थकांच्या नाराजीमुळे भाऊसाहेब कांबळेच्या अडचणीत वाढ - vikhe patil
अहमदनगर - शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना विखे समर्थकांनी मदत न करण्याच्या सूर आवळल्याने कांबळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. कांबळे यांना संगमनेर आणि अकोले तालुक्यातून थोरात आणि पिचड यांचे बळ मिळाले असले तरी, त्यांचे 'होम टाऊन' असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातच त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
श्रीरामपूर तालुक्यात विखे समर्थकांची मोठी ताकद आहे. जिल्हा परिषदेचे २ सदस्य, नगरपालिकेचे १३ नगरसेवक, पंचायत समिती सदस्य, सभापती तसेच २२ गावाचे सरपंच हे विखे समर्थक आहेत. शिर्डी लोकसभेत कोणाच्या पाठीशी उभे राहायचे आणि कोणाचा प्रचार करायचा यासाठी विखे समर्थकांचा कार्यकर्ता मेळावा श्रीरामपूर येथे घेण्यात आला. राधाकृष्ण विखे-पाटील जो निर्णय घेतील, त्यांच्या पाठीशी उभे राहणार, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
भाऊसाहेब कांबळे यांना मदत न करण्याचा कार्यकर्त्यांचा बैठकीत सूर दिसून आला आहे. विखे हाच 'आमचा पक्ष' अशी भूमिका सर्व कार्यकर्त्यांची आहे. विखे समर्थकांच्या या भूमिकेमुळे आमदार कांबळे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. तर दुसरीकडे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरही कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून टीका केली आहे.