अहमदनगर - साईबाबांच्या जन्मभूमीच्या वादावरुन आजपासून शिर्डीत बंद पाळण्यात येत आहे. या बंदला शिर्डीकरांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला आहे. हॉटेल्स पानटपऱ्या, शोरूम्स या सर्व ठिकाणी कडकडीत बंद आहे. आज रविवार असल्याने शाळा-कॉलेज, बँका बंद आहेत.
साई जन्मभूमी वाद: बंदला शिर्डीकरांचा उत्सफूर्त प्रतिसाद, साईमंदिर दर्शनासाठी खुले - साईबाबांच्या जन्मभूमीच्या वादावरुन आजपासून शिर्डीत बंद
साईबाबांच्या जन्मभूमीच्या वादावरुन आजपासून शिर्डीत बंद पाळण्यात येत आहे. या बंदला शिर्डीकरांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला आहे. हॉटेल्स पानटपऱ्या, शोरूम्स या सर्व ठिकाणी कडकडीत बंद आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डीमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र महाले यांनी....
पाथरी ही साईबाबांची जन्मभूमी असल्याबाबतचे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले होते. या वक्तव्यावरुन चांगलेच वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री त्यांचे वक्तव्य मागे घेत नाहीत तोपर्यंत, शिर्डी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला आहे. आजपासून हा बंद सुरु करण्यात येणार आहे. मात्र, मंदिर, रुग्णालये सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भाविकांनी आज रविवार असल्याने साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे. भाविकांना या बंदचा फटका बसू नये, म्हणून शिर्डीकरांनी चहा आणि नाष्ट्याची सोय ही विनामुल्य केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डीमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याच संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र महाले यांनी....