अहमदनगर - शिर्डीकरांनी बेमुदत आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. रात्री 12 वाजता आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याचे ग्रामस्थ कैलास कोलते यांनी माहिती दिली.
साई जन्मभूमी वाद : शिर्डीकरांचा आंदोलन मागे घेण्याचा निर्णय - shirdi citizens agitation
शिर्डीकरांनी बेमुदत आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
आज (रविवारी) सायंकाळी 7 वाजता शिर्डीकरांनी पुन्हा द्वारकामाई मंदिर समोर खुल्या नाट्यगृहासमोर बैठकी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिर्डी मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार सदाशीव लोखंडे उपस्थित होते. लोखंडेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सोबत आजच्या शिर्डी बंद तसेच आंदोलनाबाबत फोनवरून चर्चा केली. मुख्यमंत्र्यांचा निरोप त्यांनी या बैठकीत दिला. यानंतर या बैठकीत हा बंद मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. रात्री 12 वाजतापासून हे आंदोलन आंदोलन मागे घेण्यात येणार आहे. तसेच उद्या (सोमवारी) दुपारी साईबाबांच्या जन्मस्थळाच्या वादावर शिर्डी ग्रामस्थ-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक होणार आहे.
हेही वाचा -आंतरराष्ट्रीय विमानतळ काळाची गरज.. तसेच साईबाबा जन्मस्थळाच्या वादावर चर्तेतून तोडगा काढू -पवार