शिर्डी (अहमदनगर) - सायकल म्हटले की पहिले डोळ्या समोर येते ते हिरो सायकलचे नाव. मध्यांतरी भारत चीन दरम्यान झालेल्या तनावाच्या वातावरणात आपल्या देशातील हिरो कंपनीने चीनशी झालेला 900 कोटीचा करार रद्द केल्याने ते देशासाठी खरे हिरो ठरले आहेत. यामुळे आज ग्रामिण भागातील नागरिक ही हिरो सायकलाच पसंती देत आपल देश प्रेम व्यक्त करत आहे.
देशी हिरो सायकलच्या मागणीत वाढ सायकल म्हटले, की लहानपनाच्या जुन्या आठवणीना उजळा देणारी सायकल. सायकलचे नाव घेतले तर सर्वात प्रथम डोळ्या समोर येते ते हिरो सायकलच नाव. मात्र आलिकडच्या काळात अनेक नवीन नवीन एक से एक ब्रँडेड विदेशी सायकल देशात आल्याने हीरो सायकलची मागणी कमी होऊ लागली होती. मात्र, गेल्या काही दिवसापासून भारत - चीन हा सीमेचा वाद पेटला असल्याने विदेशी वस्तूवर भारतात बंदी आणि बहिष्कार टाकला जात असल्याने भारतातील हिरो कंपनीने चीनशी केलेला 900 कोटीचा करार रद्द करत आपले देशावर असलेले प्रेम व्यक्त केले. यामुळे आता ग्रामीण भागात हिरो सायकलला मोठी मागणी वाढू लागली असून विदेशी सायकल घेण्यास ग्रामीण भागातील नागरिक नकार देत असून आपली देशी अर्थातच हिरो सायकल घेण्यास पसंती देत असल्याचे बघायला मिळत आहे.आज शहरा बरोबर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात सायकल विकल्या जातात. त्याचे स्वरुप थोडे बदलले आहे. स्पोर्टी लुक असलेल्या सायकल व्यायामासाठी अथवा रोजच्या कामासाठी खरेदी केल्या जातात. मात्र, गेल्या काही दिवसा पूर्वी भारत - चीन सीमेचा वाद सुरू असल्याने विदेशी सायकलची मागणी कमी झाली असून आपल्या देशातील हिरो कंपनीच्या सायकलची मागणी वाढत आहे. नगर जिल्ह्यातील कोल्हार या गावातील नमोह सायकल हे नावजलेले नाव, गेल्या चाळीस वर्षापासून सुरेश कुंकुलोळ सायकलची विक्री करतायेत. आजही देशी ब्रँड विकण्यालाच ते प्राधान्य देतात. चायना ब्रँडचे काहीच विकत नाहीत, हिरो सायकलशी त्यांच अतुट नातं आहे. अनेकदा ते मुंजाल यांना भेटलेले आहेत. त्यांचे देशा बद्दल असलेल प्रेम त्यांना नेहमी प्रेरणा देत आलय....मुंबई येथे व्यवसाया निमित्ताने स्थायिक झालेले लोहकरे हे लॉक डाऊनमुळे आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर गावी परतले. त्यांना सायकल दिना निमित्ताने एक सायकल खरेदी करण्याची ईच्छा झाली. अभिजित कुपटे आणि सतेज नाझरे या मित्रांच्या सल्ल्यानुसार एक विदेशी सायकल फायनलही केली होती. त्यानंतर भारत - चीन सीमा वादाच्या बातम्या झळकू लागल्या. भारतीय हद्दीत चिनी सैन्याने केलेल्या आक्रमणाचा निषेध म्हणून हिरो सायकलने चिनी कंपनी सोबत केेलेला 900 कोटी रुपयांचा करार रद्द करुन देशावर असलेले प्रेम व्यक्त केले. सायकल सारख्या दैनंदिन वापराच्या साधनाची निर्मिती करणारी कंपनी आर्थिक नुकसान सहन करण्याची हिम्मत करून चिनी सायकल उत्पादनावर बहिष्कार टाकत असेल, देशी बनावटीची सायकल विकसित करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असेल तर आपण हिरो सायकल सोबत एक भारतीय ग्राहक म्हणून उभे राहिले पाहिजे असल्याच लोहकरे यांनी मनाने निश्चित केले. त्यानंतर राहाता तालुक्यातील कोल्हार येथील सुप्रसिद्ध नमोह सायकल दुकानातून एक हिरो कंपनीची सायकल खरेदी करून आपले देशावर असलेले प्रेम लोहकरे यांनी आमचे ईटीव्ही भारतचे प्रतिनीधी रविंद्र महाले यांच्याशी बोलताना व्यक्त केले.