महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिर्डीत अनोखी भाऊबीज; उपासनी कन्यांकडून गावातील लहान-थोर सर्वच ग्रामस्थांची ओवाळणी - Bhaubeej special story

शिर्डीच्या साकुरी येथे कन्या कुमारी देवस्थानात गावातील लहान-थोर सर्वच ग्रामस्थ एकत्र येऊन उपासनी कन्यांकडुन सामुदायिक ओवाळणी करून घेतात. गेल्या अनेक वर्षापासुन नागरीकांनी ही अनोखी परंपरा जपली आहे.

shirdi Bhaubeej special story
शिर्डीत अनोखी भाऊबीज; उपासनी कन्यांकडून गावातील लहान-थोर सर्वच ग्रामस्थांची ओवाळणी

By

Published : Nov 7, 2021, 10:59 AM IST

शिर्डी - भाऊबीज बहीण भावांच्या प्रेमाला अतुट बंधनांचा सण उत्सव आहे. आपल्या लाडक्या भावाला ओवाळण्यासाठी बहिणी माहेरी येतात. मात्र, शिर्डीच्या साकुरी येथे कन्या कुमारी देवस्थानात गावातील लहान-थोर सर्वच ग्रामस्थ एकत्र येऊन उपासनी कन्यांकडुन सामुदायिक ओवाळणी करून घेतात. गेल्या अनेक वर्षापासुन नागरीकांनी ही अनोखी परंपरा जपली आहे.

उपासनी कन्यांकडुन सामुदायिक ओवाळणी
साईबाबांचे समकालीन असलेल्या उपासणी महाराज शिर्डी जवळील साकुरी या गावातील स्मशानात राहिले. तेथेच त्यांनी आश्रम स्थापला, या आश्रमता उपासनी महाराजांनी महिलांना सर्वपुजा विधी शिकवत त्यांना धार्मिक अधिष्ठाण करण्याचा अधिकार दिला. उपासनी महाराजांच्या काळा पासुनच या ठिकाणी लहान वयातच मुली येवून राहु लागल्या. त्यांनाच उपासनी कन्या कुमारी म्हणून संबोधले जाते. भाऊबीजेच्या दिवशी प्रत्येक बहीन आपल्या भावाला ओवाळते. तसेच येथील कन्याही आपल्या गुरु बहिणी असल्याने सर्वच गावातील लहानमुले तरुण आणि पुरुष संध्याकाळी येथील मंदीरात जमा होतात. या सर्वांना एकत्र बसवत त्यांना कन्याद्वारे ओवाळले जाते. 'भाऊबीज माझे सदनी मनी हर्ष झाला', या गितांच्या सुरात आणि मंत्रांच्या घोषात हा आनोखा सोहळा केला जातो.उपासनी कन्या कुमारी स्थानात प्रामुख्याने गुजराती भाविकांच अधिक येण असल्याने हा भाऊबीजेचा सोहळा त्यांच्या दृष्टीने एक अनोखा सोहळा असतो. बाहेर गावी गेलेले ग्रामस्थही अवर्जुन या दिवशी साकुरीत येवुन आपल्या गुरुबहिनी द्वारे औक्षण करून घेतात.

ABOUT THE AUTHOR

...view details