अहमदनगर (शिर्डी):साई संस्थानात वर्षाकाठी येथे कोट्यावधी रुपयांची उलाढाल केली जाते. तसेच जवळपास तीन कोटी पेक्षा भाविक वर्षभरात साई मंदिरात दर्शनासाठी येतात. साई संस्थानचा कारभारही तसा मोठा आहे. येथे उच्च न्यायालयाच्या अधिपत्याखाली जिला प्रधान न्यायधिशांची तदर्थ कमेटी असून आएएस दर्जाचा सनदी अधिकारी येथे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी नियुक्त आहे. संस्थानच्या 44 विभागातून दिवसभरात अनेक फाईल्सचा वावर येथील कार्यालयात असतो. मात्र आता हे सर्व कामकाज पेपरलेस करण्यात आले आहे. राज्य सरकारने मागेच प्रशासकीय कारभार ई-ऑफिस करत पेपरसेल केला जाईल, असे घोषित केले होते. त्यानंतर आता साई संस्थानने राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करत आपले देखील सर्व कारभार पेपरलेस केले. या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष वाचणार असून साई बाबांनी स्वतः वृक्ष संगोपनचा संदेश दिल्याचे साई संस्थानकडून सांगण्यात आले.
संस्थानला स्वच्छतेसाठीचे ISO नामांकन: साईबाबा संस्थानला स्वच्छतेसाठीचे ISO नामांकन मिळलंय. हे ISO नामांकन साईबाबा संस्थानच्या साई प्रसादलय आणि भक्त निवासाला मिळाल्याने शिर्डीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी वर्षाकाठी करोडो तर दररोज 60 ते 70 हजार भाविक येतात. त्याचबरोबर उत्सव काळात साईबाबा प्रसादलयात 80 ते 90 हजार भाविक भोजनाचा अस्वाद घेतात.
ISO नामांकनाचे नूतनीकरण : आशियातील सर्वात मोठे प्रसादालय साई संस्थान चालवले जाते. साईबाबा संस्थानच्या साई प्रसादालयाला 2010 मध्ये ISO नामांकन मिळाले होते. तसेच साईबाबा संस्थानच्या साई आश्रम, भक्त निवास, साई प्रसादालय, भक्त निवास, दारावती भक्त निवास यांना देखील चांगली स्वच्छता राखण्यासाठी 2014 मध्ये ISO नामांकन मिळाले होते. साईबाबा संस्थानाच्या स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी दरवर्षी ISO अधिकारी शिर्डीत येतात. त्यानंतर दरवर्षी ISO नामांकनाचे नूतनीकरण केले जाते.