शिर्डी (अहमदनगर) : शिवसेनेतून तब्बल दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांनी बंडखोरी ( Two-thirds to MLA Shinde group ) केल्याने शिवसेनेला जोरदार झटका बसला आहे. एकनाथ शिंदेंच्या ( Shiv Sena Rebel Leader Eknath Shinde ) नेतृत्वाखाली हे आमदार सत्तेत आले आहेत. सत्तांतरानंतर आमदारांकडून पुन्हा मातोश्रीवर जाण्याचे संकेत दिले जात आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंकडून आमदारांना गद्दारही म्हटले जात असल्याने शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) अद्यापि आम्हाला गद्दार म्हणत असतील तर त्यांनी उद्धव ठाकरेंची भाषा शिकावी संजय राऊतांची भाषा शिकू नये, असा सल्ला आदित्य ठाकरे यांना केसरकरांनी ( Shinde group spokesperson Deepak Kesarkar ) शिर्डीत साईबाबा दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना दिला.
शिंदे गटाकडून किरीट सोमय्यांना समज : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माफिया म्हणत वादग्रस्त ट्विट किरीट सोमय्या यांनी केले. हा एक कटू प्रसंग आहे. मात्र, आम्ही आधीच भाजपकडून आमचे नेते उद्धव ठाकरे यांना कोणीही डिवचू नये, अपशब्द वापरू नये हा शब्द घेतला आहे. त्यावेळी भाजपचे सर्व आमदार, नेते, शिंदे गटाचे नेते, आमदार यांच्या समक्ष आम्ही शब्द घेतला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी आमची भावना समजून घेत बैठकीतील सर्वांना सांगत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कोणीही अपशब्द बोलणार नाही याची खात्री दिली होती. मात्र, दुर्दैवानं त्या बैठकीला किरीट सोमय्या हजर नव्हते. तेव्हा लवकरच उपमुख्यमंत्री फडणवीस यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करतील. किरीट सोमय्यांच्या ट्विटमुळे शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर पक्षश्रेष्ठी सोमय्यांना योग्य ती जाणीव करून देतील, असे स्पष्ट मत केसरकर यांनी यावेळी व्यक्त केले.
आदित्य ठाकरेंनी वडिलांची भाषा शिकावी : आदित्य ठाकरे खूप लहान आहेत. मी त्यांच्यापेक्षा दुपट्ट वयाचा आहे. मात्र, आदित्य ठाकरे समोर आले, तर मी स्वतः उठून उभा राहतो कारण ते बाळासाहेबांचे नातू आहेत. आदित्य यांना जो मान देतो तो बाळासाहेबांचा मान आहे. आदित्य ठाकरे जर बाळासाहेबांचे नातू असतील, तर असा शब्द तोंडी येताना त्यांनी दहावेळा विचार करायला हवा. आम्ही खूप बोलू शकतो मात्र बोलणार नाही. कारण बाळासाहेबांचा वारसा त्यांच्याकडे आला आहे. तेव्हा त्यांनी कसे बोलावे हे उद्धव ठाकरे यांच्याकडून शिकावं, संजय राऊत यांच्याकडून शिकू नये, असा सल्ला यावेळी केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला आहे.
भावना गवळी यांना हटवणे मनाला लागणारे :भावना गवळी यांना लोकसभेतील प्रतोप पदावरून दूर केल्याचं कारण संजय राऊत जरी वेगळं सांगत असतील तरी फक्त खासदार फुटतील अशा संशयापोटी ही कारावाई केली असल्याने शिवसैनिकांच्या मनाला लागलं आहे. बाळासाहेबांनी खासदार भावना गवळी यांना मुलगी मानलं होतं. ते असते तर कुणी त्यांना पदावरून हटवू शकलं नसतं.