महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाळा..मी महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष आहे, पवारांची मुख्यमंत्र्यांना मार्मिक समज

शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चक्क बाळा म्हणत 'पैलवान' मुद्यावर मार्मिक भाषेत समज दिली.

शरद पवार

By

Published : Oct 15, 2019, 9:37 AM IST

Updated : Oct 15, 2019, 10:06 AM IST

अहमदनगर- शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चक्क 'बाळा' म्हणत 'पैलवान' मुद्यावर मार्मिक भाषेत समज दिली. काही दिवसांपासून आमचे पैलवान तेल लावून तयार आहेत पण समोर पाहतो तर कुणीच नाही असे म्हणत विरोधकांचे कसलेही आव्हान नसल्याचा सांगण्याचा प्रयत्न केलाय. या टीकेला शरद पवारही ठिकठिकाणच्या सभेत मार्मिकपणे उत्तर देत आहे.

बोलताना शरद पवार



जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रताप ढाकणे यांच्या प्रचारार्थ बोधेगाव इथे पार पडलेल्या सभेत ते बोलत होते.

हेही वाचा - सरकारच्या अयोग्य धोरणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या -शरद पवार

जर समोर पैलवानच नाहीत तर इतकी जित्राब घेऊन का येता, असे सांगत मोदी-शहांच्या प्रचार धडाक्यावर टीका केली. एव्हढेच नव्हे तर मुख्यमंत्री फडणवीस यांना त्यांनी चक्क बाळा असे संबोधत आपण महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे अध्यक्ष असल्याची आठवण करून देत राज्यातील सर्व तालमी, संघ यातील पैलवानांना आपणच मदत करत असल्याचे सुनावले. पवारांच्या या मार्मिक टोलेबाजीला उपस्थितांनीही टाळ्या-शिट्या वाजवत दाद दिली.

हेही वाचा - कर्जमाफीसाठी ऑनलाईनच्या नावाखाली नागवणाऱ्यांना आता जाब विचारा - छगन भुजबळ

Last Updated : Oct 15, 2019, 10:06 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details