अहमदनगर- "ज्या गड-किल्ल्यांवर तलवारी चमकल्या तिथे हे सरकार छमछमचा आवाज करणार का ?" असा प्रश्न शरद पवार यांनी राज्य सरकारच्या गड-किल्ल्यांवर खासगी हॉटेल्स आणि बारला परवानगी देण्याच्या मुद्यावरुन प्रश्न उपस्थित करुन या निर्णयाची बोचऱ्या आणि मार्मिक शब्दात खिल्ली उडवली. येथे आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
हेही वाचा-कॉर्पोरेट करात कपातीने सरकारची वित्तीय जोखीम वाढणार - मूडीज
एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मोठे शिलेदार पक्ष सोडून गेले आहेत. मात्र, कुठेही नाउमेद न होता राज्याच्या दौऱ्यावर असलेले पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आपल्या मार्मिक शब्दात राज्य सरकरच्या ध्येय धोरणांवर टीका करत आहेत. तसेच त्यांच्या सोबत असलेल्या नेत्यांमध्ये जान फुंकण्याचे काम ते करत आहेत. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष करत आपण मैदान सोडलेले नसल्याचेच त्यांनी दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील उपस्थित सर्व नेत्यांच्या गाठीभेटी घेतानाच आज पवार यांनी शहरात एक 'रोड शो' केला. तसेच मेळाव्यास उपस्थित राहत आपल्या भाषणात चौफेर टोले बाजी केली.
हेही वाचा-सकाळपासून अनेकांचे फोन, काँग्रेसमध्ये येण्यास बरेचजण इच्छुक - बाळासाहेब थोरात
नाशिक येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार हे पाकिस्तान बाबत अनुकूल बोलत असल्याची टीका केली होती. मोदी यांच्या टीकेला आज पवार यांनी उत्तर देताना आपण तेथील राज्यकर्त्यांच्या मानसिकतेवर भाष्य केले होते, असे स्पष्ट केले. तसेच मोदी करत असलेली टीका ही त्यांच्या पदाला शोभणारी नाही असेही पवार यांनी सांगितले.