शिर्डी : राज्यात सत्तांतर झालेले काही लोकांना आवडलेले नाही. त्यामुळे आगामी काळात लवकरच एक वेगळे चित्र पाहण्यास मिळेल ( Different Picture will Emerge soon ) , असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला होता. पवारांच्या या वक्तव्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी खरमरीत टीका केली ( Vikhe Patil Sharply Criticized Pawar Statement ) आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना युतीत निवडणूक लढले होते, त्यावेळी विश्वासघात केला गेला. खरं तर शरद पवार यांनी आत्मपरीक्षण करावे, असे विखे पाटील यांनी शिर्डीत साईबाबा दर्शनानंतर म्हटले आहे.
महाराष्ट्राला जनतेच्या मनातलं सरकार मिळाले : महाराष्ट्राला लोकांच सरकार मिळाले असून, जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अडीच वर्षांत समाजातील कोणताच घटक समाधानी नव्हता. कारण महाविकास आघाडी सरकार हे विश्वासघाताने आलेले सरकार होते. मात्र, पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र नोदी यांच्या नेतृत्वाखाली राज्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून राज्य कारभार संभाळत आहे. जनतेच्या अपेक्षा हे सरकार पूर्ण करेन, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना गुरुपौर्णिमा निमित्ताने साईबाबांनी शक्ती द्यावी, अशी प्रार्थना केल्याचे विखे पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.
शिवसेनेला उशिरा सुचलेले शहाणपण : राष्ट्रपती पदाच्या एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेनं पाठींबा जाहीर केला आहे. हे स्वागतार्हच असून, शिवसेनेला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. हा पाठिंबा कोणत्या मजबुरीनं दिला हे माहीत नाही, मात्र बहुतांश खासदारांची मागणी होती तेव्हा लोकप्रतिनिधी किंवा खासदारांच ऐकावं लागतं. आणि हे आता शिवसेनेच्या नेतृत्वाला समजायला लागले आहे, असे म्हणत आमदार विखे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
पवारांनी आत्मपरिक्षण करावं : शरद पवार यांनी राज्यातील सत्ता परिवर्तन लोकांना आवडलेलं नाही. त्यामुळे आगामी काळात लवकरच एक वेगळे चित्र पाहण्यास मिळेल, असा दावा केला आहे. यावर बोलताना विखे पाटील यांनी शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावे, अशी टीका केली आहे. अडीच वर्षांपूर्वी शिवसेना भाजप युतीत निवडणूक लढवली. त्यात 160 पेक्षा आधिक जागा जिंकल्या, अशा वेळी महाविकास आघाडी सरकार स्थापन करून विश्वासघात कोणी केला याचे आत्मचिंतन त्यांनी स्वतः करावे, अशी टीका विखे पाटील यांनी यावेळी केली.