महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शरद पवार अन् नितीन गडकरींकडून खूप काही शिकण्यासारखे - राज्यपाल - शरद पवार

शरद पवार यांचा सहकार, कृषी, बँकिंग, समाजकारण यातील अनुभव आणि कार्य दिशादर्शक आहे. त्यांच्याकडे कुणीही यावे आणि या विषयावर बोलावे, त्यांच्याकडून खूप काही घेण्यासाठी सारखे आहे. तसेच नितीन गडकरी हे सर्व क्षेत्रातील मातब्बर आहेत. त्यांच्याकडून हातात घेतलेले काम पूर्णत्वास घेऊन जाणे हे शिकावे, अशी प्रतिक्रिया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली. ते राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 35 वा पदवीदान समारंभावेळी बोलत होती.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र

By

Published : Oct 28, 2021, 7:13 PM IST

अहमदनगर- राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा 35 वा पदवीदान समारंभ गुरुवार (दि. 28 ऑक्टोबर) कृषी विद्यापीठाच्या मध्यवर्ती परीसरात संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राज्‍यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कुलपती भगत सिंह कोश्यारी होते. कार्यक्रमास प्रतिकुलपती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी तथा, कृषी आणि माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे, यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सहकार, कृषी, विकास आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विद्यापीठाकडून कुलपती तथा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते मानद डॉक्टरेट पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. दीक्षांत भाषण उदयपूर येथील महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नरेंद्र सिंह राठोड यांनी केले. या समारंभासाठी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, विद्यापीठ कार्यकारी आणि विद्या परिषदेचे सन्माननीय सदस्य आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते.

दीक्षांत समारोहवेळी

पवार-गडकरी शायनिंग स्टार

पदवीदान सोहळ्यात राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने ज्येष्ठ नेते शरद पवार आणि केंद्रीय रस्ते-वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी राज्यपाल कोश्यारी म्हणाले, पवार यांचा सहकार, कृषी, बँकिंग, समाजकारण यातील अनुभव आणि कार्य दिशादर्शक आहे. त्यांच्याकडे कुणीही यावे आणि या विषयावर बोलावे, त्यांच्याकडून खूप काही घेण्यासाठी सारखे आहे. तसेच नितीन गडकरी हे सर्वक्षेत्रातील मातब्बर आहेत. हातात घेतलेले काम पूर्णत्वास घेऊन जाणे हे त्यांच्याकडून शिकावे. पंतप्रधान मोदी आणि गडकरी यांच्यात जणू नवंनव्या योजना देशासाठी आणणे यात जणू स्पर्धा असते असे वाटते. पवार-गडकरी ही खूप मोठी माणसे आहेत. विद्यापीठ त्यांना डॉक्टरेट शिवाय काय देऊ शकते, ही दोन्ही लोक देशाचे शायनिंग स्टार अर्थात दैदिप्यमान तारे आहेत, देशाला त्यांच्या कार्याबद्दल सदैव अभिमान असेल, अशा शब्दात राज्यपालांनी पवार-गडकरी यांचा सन्मान केला.

शेतकरी हा कृषीविद्यापीठांचा आधार

अशिक्षित, कष्टाळू आणि मातीला जागणारा शेतकरी हा कृषी विद्यापीठांचा आधार आहे. तो अडाणी असला तरी वेगवेगळे प्रयोग करत असतो. विद्यापीठाने आता मातृभाषेत कृषी आणि कृषी तंत्रज्ञान शिकवले पाहिजे, ही काळाची गरज आहे, यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा कुलपतींनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांमुळे साथरोगातही अर्थचक्र सुरू

कोरोना साथ रोगात सर्व देश, उद्योग ठप्प झाले होते. मात्र, कृषी उद्योग हा अविरत सुरू होता. त्यांच्यामुळे देशाचे अर्थचक्र त्यामुळे सुरळीत राहिले. हे या देशातील शेतकऱ्यांचे देशाप्रती समर्पण आहे. त्यामुळे कृषी उद्योगाला कमी लेखू नका. आपल्या पूर्वजांनी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी, असे उगाच सांगितलेले नाही0 यावर कृषी विद्यापीठातून पदवी घेतलेल्या स्नातकांनी लक्ष दिले पाहिजे आणि आपल्या शिक्षण, अनुभवाचा वापर कृषी क्षेत्रासाठी केला पाहिजे. हे आपले कर्तव्य समजले पाहिजे, असे राज्यपाल कोश्यारी यावेळी म्हणाले.

हे ही वाचा -आमदार-खासदार होण्यापेक्षा वैद्यकीय क्षेत्रात काम करा, तुमच्या दहा पिढ्या चांगल्या होतील - राज्यपाल

ABOUT THE AUTHOR

...view details