महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

१५ वर्षानंतर शनिशिंगणापूर ग्रामपंचायतीत सदस्यांची निवड बिनविरोध - मंत्री शंकरराव गडाख

शनिशिंगणापूर येथे असलेल्या दोन राजकीय गटामुळे देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतमध्ये नेहमीच राजकीय कलगीतुरा रंगायचा. मात्र, मंत्री शंकरराव गडाख यांनी शनैश्वर देवस्थान करीता गावातील मूळ रहिवासीच विश्वस्त होणार, अशी घटना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने पुर्ववत करून आणल्याने गावातील सर्व विरोधक एका छताखाली आले आहेत.

Minister Shankarrao Gadakh
मंत्री शंकरराव गडाख

By

Published : Jan 4, 2021, 10:56 PM IST

अहमदनगर - शनिशिंगणापूर येथे असलेल्या दोन राजकीय गटामुळे देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतमध्ये नेहमीच राजकीय कलगीतुरा रंगायचा. मात्र, मंत्री शंकरराव गडाख यांनी शनैश्वर देवस्थान करीता गावातील मूळ रहिवासीच विश्वस्त होणार, अशी घटना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने पुर्ववत करून आणल्याने गावातील सर्व विरोधक एका छताखाली आले आहेत.

हेही वाचा -लग्नातील जेवणातून सुमारे 200 लोकांना विषबाधा; राहुरीच्या टाकळीमिया येथील घटना..

देवस्थान ट्रस्टसाठी ग्रामपंचायत गटाने अर्ज भरले नव्हते. तसेच, ग्रामपंचायतीसाठी देवस्थान विश्वस्त गटाने अर्ज भरले नव्हते. या ग्रामपंचायतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते.

मंत्री गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान ट्रस्टचे काम चांगले असून, त्यांनी ग्रामपंचायत विकास कामात महत्वाचे योगदान दिले आहे, असे मत बापुसाहेब शेटे यांनी व्यक्त केले. बाहेरचे राजकारणी दिशाभूल करीत असल्याने आम्ही युवक भरकटलो होतो. गडाख यांच्यामुळे नवीन विश्वस्त सर्वसमावेशक निवडले व ग्रामपंचायतही बिनविरोध झाली, असे नूतन सदस्य बाळासाहेब कुऱ्हाट यांनी सांगितले.

बिनविरोध सदस्यांची नावे

शिवाजी जगन्नाथ शेटे, कल्पना शरद देठे, कुसूम जालिंदर दरंदले, बेबी भिमराज बानकर, पुष्पा बाळासाहेब बानकर, स्वप्नील बाळासाहेब बोरुडे, वैशाली रमेश शेटे, बाळासाहेब बापुसाहेब कुऱ्हाट, राजेंद्र तुकाराम शेटे.

हेही वाचा -दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनातील शहिदांना श्रीरामपुरात सर्व पक्षीय श्रद्धांजली

ABOUT THE AUTHOR

...view details