अहमदनगर -शनिशिंगणापुर येथे कोरोना संसर्गाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रथमच भाविकांच्या विरहित फक्त पंचवीस जणांच्या उपस्थितीमध्ये शनिजयंती निमित्त अभिषेक आणि आरती सोहळा करण्यात आला.
शनिशिंगणापुरात भाविकांशिवाय शनिजयंती साजरी - Shani Jayanti celebration without devotees
आज स्वयंभू शनिमूर्तीला वस्र, अलंकार व मुखवटा घालण्यात आला होता. चौथऱ्याला शनिभक्त व्यंकटेश राव यांच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
![शनिशिंगणापुरात भाविकांशिवाय शनिजयंती साजरी Shani Jayanti celebration](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7306798-708-7306798-1590150969098.jpg)
कोरोना संसर्गास प्रतिबंध म्हणून दोन महिन्यापासून शनीमंदीर दर्शनासाठी बंद करण्यात आलेले आहे. आज शनिजयंती निमित्त पोलीस प्रशासन व देवस्थान सुरक्षा विभागाने महाद्वार येथून एकाही भाविकास आत सोडले नाही. पुरोहित अशोक कुलकर्णी यांनी स्वयंभू शनिमुर्तीला गंगेच्या पाण्याने अभिषेक घातला. महंत त्रिबंक महाराज यांच्या हस्ते महापूजा व आरती सोहळा झाला. दुपारी बारा वाजता झालेल्या आरती सोहळ्यास देवस्थानचे कोषाध्यक्ष योगेश बानकर, विश्वस्त भागवत बानकर, विनायक दरंदले, मंदिराचे पुरोहित असे मोजकेच लोक उपस्थित होते. आज स्वयंभू शनिमूर्तीला वस्र, अलंकार व मुखवटा घालण्यात आला होता. चौथऱ्याला शनिभक्त व्यंकटेश राव यांच्या वतीने फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.