अहमदनगर :शनि शिंगणापूर येथे शनि जयंतीनिमित्त भाविकांची गर्दी झाली आहे. शनि महाराजांचा जन्म वैशाख कृष्ण अमावस्येला असतो. अहमदनगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर येथे मोठ्या उत्साहात शनि जयंती साजरी केली जाते. शनि जयंती निमित्त भक्तांच्या हितासाठी, कल्याणासाठी पाच दिवस शनि याग केला जातो. त्याचबरोबर भजन कीर्तन देखील केले जाते. शनि जयंती असल्याने पहाटे 4 वाजल्या पासूनपूजा अर्चा केली जात आहे.
भक्तांच्या सोईसाठी प्रशासन सज्ज :आज दुपारी 12 वाजता जन्म आरती केली जाणार आहे. पाय जाऊन कावडीने आणलेल्या गोदावरीच्य पाण्याने शनि देवाला जलाभिषेक केला जातो. शनि शिंगणापूर येथील ग्रामस्थ हे काशीला जाऊन तेथील पाणी आणतात. ते देखील शनि देवाला अर्पण केले जाते. अश्या पद्धतीने मोठ्या उत्साहात शनि जयंती शनि शिंगणापूर येथे साजरी केली जाते. शनि जयंतीनिमित्त येणाऱ्या भक्तांसाठी बूंदीचा प्रसाद म्हणून वाटप केले जाते. त्याची तयारी देखील मंदिर परिसरात रात्रभर केली जाते. आलेल्या भक्तांच्या सोईसाठी प्रशासन सज्ज आहे. भाविकांनी नियमाचे पालन करून शनि देवाचे दर्शन घेऊन शनि जयंती साजरी करावी, असे आवाहन देखील मंदिर प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.