अहमदनगर -शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमगाव शिवारातील हॉटेल साईधन येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात ३ महिला आणि ६ दलालांसह पुरूष ग्राहक अशा १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. कारवाई वेळी या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याने पोलिसांनी पिटा कायद्यांतर्गत कारवाई करून हॉटेल चालक आणि इतर पुरुषांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुख्य आरोपीलाही अटक करण्यात आली असून पोलिसांनी खाक्या दाखवताच येथे व्हॉटसअपच्या माध्यमातून सेक्स रॅकेट सुरू असल्याचे आरोपींनी सांगितले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या मोबाईलमध्ये मुंबईसह इतर ठिकाणच्या दोनशे पेक्षा आधिक मुलींचे फोटो असल्याचे आढळून आले आहेत. पोलिसांनी आधिक तपास करत या सेक्स रॅकेटाचा छडा लावला असून पिटा कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईत एक मुलगी अल्पवयीन असल्याचे उपविभागीय पोलीस उपअधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले.