अहमदनगर - सध्या कोरोना आजाराची साथ सर्वत्र सुरू आहे. या आजारात मृत्यूचे प्रमाण जरी कमी असले तरी वृद्ध व्यक्तींना कोरोनाचा अधिक धोका आहे. रोग प्रतिकारशक्ती कमी असल्याने या आजाराने वृद्ध लवकर दगावत आहेत. मात्र, अशात संगमनेर येथील 75 वर्षीय आजोबा कोरोनावर मात करत ठणठणीत बरे झाले आहेत.
संगमनेरमधील 75 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात, टाळ्यांच्या गजरात रुग्णालयातून डिस्चार्ज - संगमनेरमधील कोरोनामुक्त रुग्ण
संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ड्रामा सेंटरमध्ये नाशिकचे 75 वर्षीय कोरोनाबाधित आजोबा 12 दिवसांपुर्वी उपचारासाठी दाखल झाले. अनेकांना वाटले की आजोबा कोरोनावर मात करण्यात अयशस्वी ठरतील. मात्र, संगमनेरमधील डॉक्टरांची योग्य उपचार पद्धत आणि 75 वर्षीय आजोबांचा उपचाराला मिळणारा प्रतिसाद यामुळे हे शक्य झाले.

संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील ड्रामा सेंटरमध्ये नाशिकचे 75 वर्षीय कोरोनाबाधित आजोबा 12 दिवसांपुर्वी उपचारासाठी दाखल झाले. अनेकांना वाटले की आजोबा कोरोनावर मात करण्यात अयशस्वी ठरतील. मात्र, संगमनेरमधील डॉक्टरांची योग्य उपचार पद्धत आणि 75 वर्षीय आजोबांचा उपचाराला मिळणारा प्रतिसाद यामुळे हे शक्य झाले. अखेर 75 वर्षीय आजोबांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.
रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर हास्य फुलले. आज या आजोबांना संगमनेरच्या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी संगमनेरचे प्रांत आधिकारी, तहसीलदार, सर्व डॉक्टर, नर्सेस यांनी टाळ्या वाजवत आजोबांना निरोप दिला.