अहमदनगर- रविवारचा दिवस संगमनेरकरांसाठी चिंतेचा ठरला आहे. प्रशासनाच्या अधिकृत वृत्तानुसार संगमनेर शहरातील कंटेनमेंट क्षेत्रात आज नव्याने सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, शनिवारी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे, संगमनेरमधील कोरोना रुग्णांची संख्या शंभरहून अधिक झाली आहे.
संगमनेरमध्ये सात नव्या कोरोना रुग्णांची नोंद, एकूण बाधितांचा आकडा शंभरी पार - संगमनेरमध्ये सात नव्या कोरोना रुग्णांची नोंद
प्रशासनाच्या अधिकृत वृत्तानुसार संगमनेर शहरातील कंटेनमेंट क्षेत्रात आज नव्याने सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर, शनिवारी तीन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे, संगमनेरमधील कोरोना रुग्णांची संख्या शंभरहून अधिक झाली आहे.

संगमनेरमध्ये सात नव्या कोरोना रुग्णांची नोंद
शहरात आज दुपारी 7 कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने शहराने 103 कोरोनाबाधितांचा आकडा गाठला आहे. कोल्हेवाडी येथील 44 वर्षीय आणि 60 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. तसेच शहरातील राजवाडा भागातील 38 वर्षीय महिला बाधित झाली असून दिल्ली नाका येथील 42 वर्षीय पुरुष, नाईकवाडपुरा येथील 65 वर्षीय महिला आणि 36 वर्षीय पुरुष तर भारत नगर येथील 70 वर्षीय पुरुष यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तहसीलदार अमोल निकम यांनी याबद्दलची माहिती दिली.