शिर्डी- नेवासामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अनामत रक्कम प्लॅस्टिक पिशवीत आणल्याने एका उमेदवाराला पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागला आहे. सोमवारी दुपारी नेवासा येथे हा प्रकार घडला आहे. तालुक्यातील देवगाव येथील मच्छिंद्र देवराव मुंगसे असे कारवाई झालेल्या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होताच प्लॅस्टिक बाळगल्याने कारवाई झाल्याने तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रक्कम प्लॅस्टिक पिशवीत आणल्याने ठोठावला 5 हजाराचा दंड हेही वाचा - मंत्रिपद देणार तिकडूनच लढणार; अनिल गोटेंचा सेना प्रवेशाचाही संकेत
देवगाव येथील मुंगसे यांनी अनामत रक्कम भरण्यासाठी दहा हजाराची चिल्लर आणली होती. त्यामध्ये पाचशे रुपयाचे वीस बंडल प्लॅस्टिक पॅकेटमध्ये आणले होते. प्लॅस्टिक बंदी असताना सदरची रक्कम ही प्लॅस्टिकमध्ये आणल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराज मोरे व नगरपंचायतचे मुख्याधिकारी आणि सहायक निवडणूक अधिकारी समीर शेख यांच्या लक्षात आले. त्यानंतर मुंगसे यांना पाच हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.
हेही वाचा - पीएमसी बँक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल
यावेळी दंड भरताना एक हजाराची चिल्लरसह पाच हजार रुपये भरून दंडाची पावती व उमेदवारी अर्ज भरताना एक हजाराच्या चिल्लरसह दहा हजाराची अनामत रक्कम मुंगसे यांना भरावी लागली. नेवासा येथे नगरपंचायत असूनही प्लॅस्टिकविरोधी फारसी कारवाई झालेली नाही. मात्र, या कारवाईने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.