अहमदनगर - सरपंचाची निवड यापुढे जनतेऐवजी ग्रामपंचायत सदस्यांमधून करण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयाला सरपंच परिषद, मुंबई-महाराष्ट्र संघटनेने विरोध केला आहे. तसेच यापुढेही अनुकूल निर्णय होईपर्यंत या निर्णयाविरोधात लढा देत राहणार असल्याचे परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गीते यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुद्धा सरपंच परिषदेच्या भूमिकेशी सहमती दर्शवली आहे. अण्णा त्यांचे मौनव्रत आंदोलन सुटल्यानंतर सरपंच परिषदेच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती गीते यांनी दिली.
सरपंच परिषदेच्या भूमिकेला अण्णा हजारेंचा पाठिंबा - sarpanch parishad council latest news
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुद्धा सरपंच परिषदेच्या भूमिकेशी सहमती दर्शवली आहे. अण्णा त्यांचे मौनव्रत आंदोलन सुटल्यानंतर सरपंच परिषदेच्या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती गीते यांनी दिली.
हेही वाचा -'मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेबाबत तपासणी करावी लागणार'
अनिल गीते पुढे म्हणाले, 26 आणि 27 जानेवारी रोजी राज्यातील 14 हजारांहून अधिक ग्रामपंचायतींनी सरकारने निर्णय बदलावा आणि पूर्वी प्रमाणेच जनतेतून सरपंच निवडीची पद्धतच कायम असावी, असा ठराव करून सरकारकडे पाठवला आहे. मात्र, असे असतानाही ग्रामीण जनतेच्या भावना समजून न घेता सरकारने घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत सरकार मधील सहभागी पक्षांच्या अनेक नेत्यांनी भेट मागूनही वेळ न मिळाल्याचे त्यांनी सांगितले.