महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Anna Hazare Ralegansiddhi : 'लोकायुक्त कायदा करा, अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा'

अडीच वर्षे उलटून देखील लोकायुक्त कायद्यावर ( Lokayukta Act ) काहीच होत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यावर बोलायला सुद्धा तयार नाहीत. नेमके या कायद्याबद्दल काय झाले, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठं जनआंदोलन करण्याची गरज आहे, असे म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Senior social activist Anna Hazare ) यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Anna Hazare Ralegansiddhi
Anna Hazare Ralegansiddhi

By

Published : May 15, 2022, 3:02 PM IST

Updated : May 15, 2022, 3:13 PM IST

राळेगणसिद्धी - लोकायुक्त कायदा बनविण्याचे लेखी आश्वासन देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होत. मात्र, अडीच वर्षे उलटून देखील त्यावर काहीच होत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यावर बोलायला सुद्धा तयार नाहीत. नेमके या कायद्याबद्दल काय झाले, हे कळायला मार्ग नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात मोठं जनआंदोलन करण्याची गरज आहे, असे म्हणत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ( Senior social activist Anna Hazare ) यांनी राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

प्रतिक्रिया देताना अण्णा हजारे

'...अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा' :राज्यातील 35 जिल्ह्यात आणि अडीचशेपेक्षा अधिक तालुक्यात भ्रष्टाचार विरोधी जनांदोलनाची कमिटी तयार झाली असल्याची माहिती अण्णांनी दिली. सोबतच फडणवीस सरकारच्या काळात कायदा बनविण्याचे आश्वासन आम्हाला दिले गेले होते. त्यानंतर सरकार गेले, नंतर आलेल्या ठाकरे सरकारने देखील आम्हाला लेखी आश्वासन दिले. दरम्यान सात बैठका सरकार प्रतिनिधींनसोबत देखील झाल्या पण पुढे काहीच झाले नाही. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही, असे अण्णांनी म्हटले आहे. तसेच 'एकतर कायदा करा अन्यथा सरकारमधून पायउतार व्हा' असा इशारा अण्णांनी सरकारला दिला आहे.

हेही वाचा -Nav Sankalp Shivir: नाना पटोले यांचा भाजपवर घणाघात; पहा काय म्हणाले नाना

Last Updated : May 15, 2022, 3:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details