महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पार्थ प्रमाणे रोहितचे पार्सल कर्जत-जामखेडकरांनी परत पाठवावे - मुख्यमंत्री

कर्जत-जामखेडकरांनी मावळच्या जनतेप्रमाणे हिंमत दाखवून पार्थचे पार्सल जसे परत पाठवले तसे कर्जत-जामखेड मध्ये आलेले रोहित नावाचे पार्सलही परत पाठवण्याची हिम्मत दाखवावी. तसेच मला विश्वास आहे. राम शिंदे हे गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वात तयार झालेले आहेत. त्यांच्यासमोर कितीही मोठा पहिलवान आला तर त्याला चितपट करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगर येथील सभेत बोलताना.

By

Published : Oct 11, 2019, 6:16 PM IST

अहमदनगर - लोकसभा निवडणूकीत ज्याप्रमाणे पार्थ पवार यांचा पराभव झाला होता. मावळवासियांनी त्यांचे पार्सल ज्याप्रमाणे बारामतीला परत पाठवले त्याचप्रमाणे आता विधानसभा निवडणूकीत रोहित पवार यांचेदेखील पार्सल परत पाठवण्याची हिम्मत कर्जत जामखेडकरांनी दाखवावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.

पार्थ प्रमाणे रोहितचे पार्सल कर्जत-जामखेडकर परत पाठवावे - मुख्यमंत्री

हेही वाचा -'मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला लुटले, आमचा लढा फडणविसांविरोधातच'

कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सिद्धटेक येथील सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी शरद पवार यांचे नातू आणि राम शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत असलेले रोहित पवार यांच्यावर टीका जोरदार टीका केली.

हेही वाचा -.... आता पोत्यात पैसे नेले तर खिशात सामान येते - छगन भुजबळ

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, कर्जत-जामखेडकरांनी मावळच्या जनतेप्रमाणे हिंमत दाखवून पार्थचे पार्सल जसे परत पाठवले तसे कर्जत-जामखेड मध्ये आलेले रोहित नावाचे पार्सलही परत पाठवण्याची हिम्मत दाखवावी. तसेच मला विश्वास आहे. राम शिंदे हे गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वात तयार झालेले आहेत. त्यांच्यासमोर कितीही मोठा पहिलवान आला तर त्याला चितपट करण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तर सिद्धटेक येथे झालेल्या सभेमध्ये श्रीगोंद्याचे काँग्रेसचे नेते राजेंद्र नागवडे त्याचबरोबर पारनेर मधील राष्ट्रवादीचे सुजित झावरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

ABOUT THE AUTHOR

...view details