महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धबधब्यात पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा शोध सुरूच; एनडीआरएफ दाखल - रुईचोंढा धबधबा पोलीस अपघात

पावसाळ्यात अनेकजण पर्यटनासाठी नदी, धबधबे, धरणांच्या ठिकाणी जातात. अनेकवेळा फोटो काढण्याच्या नादात अपघात होऊन जीवही जातात. मात्र, तरीही अशा घटनांमधून काहीही बोध नागरिक घेत लसल्याचे दिसते. पारनेर तालुक्यात अशीच एक घटना घडली आहे.

Ganesh Dahiphale
गणेश दहिफळे

By

Published : Sep 26, 2020, 3:45 PM IST

अहमदनगर - पारनेरच्या रुईचोंढा डोहात पडलेले लोहमार्ग पोलीस कर्मचारी गणेश दहिफळे यांचा शोध आजही सुरूच आहे. गुरुवारी रुईचोंढा धबधब्यावर सेल्फी काढण्याच्या नादात दहिफळे यांचा तोल गेला व ते खोलगट डोहात पडले होते. आज सकाळपासून एनडीआरएफची एक टीम घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी शोधकार्य सुरू केले आहे.

धबधब्यात पडलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा शोध सुरूच

मांडओहोळ (ता.पारनेर) येथील धरण परिसरात रूईचोंढा धबधबा आहे. नगर येथील चार रेल्वे पोलीस कर्मचारी या धबधब्यावर पर्यटनासाठी गेले होते. यातील गणेश दहीफळे (रा.खरवंडी कासार ता.पाथर्डी) यांचा सेल्फी काढताना तोल जाऊन ते पाण्यात पडले होते. त्यांना पोहता येत नसल्याने या ठिकाणी पाण्याच्या प्रवाहाने तयार झालेल्या खोल भोवऱ्यात ते अडकले असावेत, अशी शक्यता स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

या घटनेची माहिती मिळाताच पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी जावून मदतकार्य सुरू केले होते मात्र, दहिफळे यांचा तपास लागला नाही. आज एनडीआरएफच्या जवानांच्या माध्यमातून शोधकार्य सुरू आहे.

धोकादायक फलक लावण्याची गरज -

मांडओहोळ धरण व रूईचोंढा धबधबा परीसरात अनेक धोकादायक जागा आहेत की, त्या ठिकाणी गेल्यानंतर मोठा अपघात होऊ शकतो. या धबधब्यावरून उडी मारताना अनेकांनी आपला जीवही गमावला आहे. त्यामुळे इतर पर्यटन स्थळांवर जसे धोकादायक जागेचे फलक असतात, तसे येथे लावण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details