महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोपरगावात भंगार व्यावसायिकाचा खिसा कापला; सव्वा लाख रुपयांची चोरी - कोपरगाव भंगार व्यावसायिक न्यूज

कोपरगाव शहरातील समीर रंगरेज या भंगार व्यावसायिकाचा चोरट्यांनी खिसा कापला. चोरट्याने त्यांचा पँटच्या खिशात हात घालून बळजबरीने आतील 1 लाख 24 हजार 600 रुपये काढून घेतले व गाडीवरून उतरून पळून गेले. त्या चोरट्यांचा रंगरेज यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले.

Theft
चोरी

By

Published : Aug 26, 2020, 12:02 PM IST

अहमदनगर - कोपरगाव शहरातील बँकेत भरणा करण्यासाठी जात असलेल्या भंगार व्यावसायिकाकडे लिफ्ट मागून चोराने पॅन्टच्या खिशातील 1 लाख 24 हजार 600 हजार रुपये लंपास केल्याची घटना घडली. या चोरीत एकूण चार व्यक्तींचा सहभाग असल्याचे सीसीटीव्ही चित्रीकरणातून समोर आले आहे. या चारही आरोपींनी पीडित व्यावसायिकावर पाळत ठेवल्याचेही चित्रीकरणात दिसत आहे.

कोपरगावात भंगार व्यावसायिकाचा खिसा कापला

समीर अकबर रंगरेज, असे पीडित व्यावसायिकाचे नाव आहे. ते कोपरगाव शहरात शेळीपालन आणि भंगार विक्रीचा व्यावसाय करतात. आज शहरातील खंदकनाला येथील स्टेट बँक शाखेत पैशांचा भरणा करण्यासाठी गेले असता, त्यांची रक्कम मुख्य शाखेत भरावी लागेल असे तेथील कॅशियरने सांगितले. त्यामुळे ते गोदाम गल्लीतील मुख्य शाखेत भरणा करण्यासाठी निघाले. तेथे जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांनाही गोदाम गल्लीतील स्टेट बँकेत भरणा करायचा असल्याचे सांगत त्यांच्या सोबत गाडीवर येऊ देण्याची विनंती केली.

त्यानंतर गाडीमध्येच एका ठिकाणी थांबवण्यास सांगून मागे बसलेल्या चोरट्याने त्यांचा पँटच्या खिशात हात घालून बळजबरीने आतील 1 लाख 24 हजार 600 रुपये काढून घेतले व गाडीवरून उतरून पळून गेले. त्या चोरट्यांचा रंगरेज यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले. रंगरेज यांनी या प्रकरणी कोपरगाव पोलीस स्थानकात तक्रार दिली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details