अहमदनगर- पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथील मातोश्री इंजिनिअरींग कॉलेजमध्ये ४५ वे जिल्हास्तरीय विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले.
विज्ञान गणित व पर्यावरण प्रदर्शनाचे आयोजन... हेही वाचा-'महाराष्ट्रात निर्माण झालेले गुन्हेगारी स्वरूपाचे चित्र राज्याला शोभणारे नाही'
या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रताप शेळके, कृषी व बांधकाम सभापती काशिनाथ दाते, महिला बालकल्याण सभापती मीरा शेटे, इस्रोचे शास्रज्ञ डाॅ.धनेश बोरा, पंचायत समिती पारनेर सभापती गणेश शेळके, टाकळी ढोकेश्वर, सरपंच सुनिता झावरे यांच्यासह पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या जिल्ह्यातील तीन विद्यार्थ्यांची प्रत्येक वर्षी इस्रोमध्ये सहलीसाठी निवड केली जाते. यासाठी पंधरा लाखांची तरतूद केली जाते. असा उपक्रम राबवणारा अहमदनगर हा एकमेव जिल्हा आहे, असे जि.प.अध्यक्षा राजश्री घुले यांनी सांगितले.