महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

..म्हणून लक्ष्यवेधी ठरला शालेय विद्यार्थ्यांचा 'बेटी बचाव, बेटी पढाव'चा संदेश - dk more janta vidyalaya

संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील डीके मोरे जनता विद्यालयात आज ७१ वा प्रजासत्ताक दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यालयातील १५४५ विद्यार्थ्यांची एक आकर्षक रचना तयार करून या माध्यमातून 'बेटी बचाव बेटी पढाओ' या घोषवाक्याद्वारे संदेश देण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या स्वरुपात दिला 'बेटी बचाव, बेटी पढाव'चा संदेश
प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या स्वरुपात दिला 'बेटी बचाव, बेटी पढाव'चा संदेश

By

Published : Jan 26, 2020, 9:10 PM IST

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील डीके मोरे जनता विद्यालयात आज ७१ वा प्रजासत्ताक दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. विद्यालयातील १५४५ विद्यार्थ्यांची एक आकर्षक रचना तयार करून या माध्यमातून 'बेटी बचाव बेटी पढाओ' या घोषवाक्याद्वारे संदेश देण्यात आला.

प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी आगळ्यावेगळ्या स्वरुपात दिला 'बेटी बचाव, बेटी पढाव'चा संदेश

आज मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न फार गंभीर झाला आहे. प्रत्येकाने मुलीला शिक्षित केले पाहिजे संरक्षण दिले पाहिजे. तसेच प्रत्येकाच्या मनात मुलींविषयी आदरभाव निर्माण व्हावा म्हणून सामाजिक संदेश देण्यासाठी प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. 'बेटी बचाव, बेटी पढाव' हा सामाजिक संदेश देण्यासाठी या दिनी ही रचना तयार करण्यात आली. या विद्यालयातील क्रीडा शिक्षक बाळासाहेब कांडेकर, सत्यानंद कसाब, पोपट, या शिक्षकांनी ही आगळीवेगळी संकल्पना राबवली.

ABOUT THE AUTHOR

...view details