तब्बल वर्षभरानंतर पुन्हा वाजली शाळेची घंटा; कोरोना नियमांचे पालन अनिवार्य
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना मुक्त असलेल्या काही ग्रामपंचायतींनी अद्याप जिल्हा प्रशासनाला शाळा सुरू करण्याबाबतचा ठराव पाठवला नसल्याने काही भागातील शाळा आजही उघडल्या नाहीत. विद्यार्थांमध्येही फारसा उत्साह नसल्याचे दिसुन आले आहे. ग्रामीण भागात काही गावात कोरोनाचे रुग्ण नाहीत. मात्र त्या गावात इतर गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना राहण्याची व्यवस्था शक्यतो त्याच गावात करण्यात यावी
शिर्डी(अहमदनगर)- जिल्ह्यातील कोरोनामुक्त ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या परिसरातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग आजपासून सुरू झाले आहेत. गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे राज्यातील शाळा ऑनलाइन पद्धतीनेच सुरू आहे. आज काही ग्रामिण भागात शाळा सुरू झाल्यानंतर टप्प्याटप्याने विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्यात आले आहे. शाळेत कोरोनासंबंधी नियमांचे पालन करण्याचा प्रयत्न शाळा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आदीचा वापर काही ठिकाणी काटेकोर पध्दतीने करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.