शिर्डी- कोपरगावच्या सातभाई मर्चंट बँकेने पतसंस्थेचे कोट्यावधी रुपये थकवल्याने ठेवीदार पतसंस्था अडचणीत आल्या आहेत. याविरोधात पतसंस्थांच्या संचालकांनी सोमवारपासून कोपरगाव निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते.
सर्वसामान्य ठेवीदारांचे पैसे असलेल्या कोपरगाव तालुक्याच्या परिसरातील अनेक पतसंस्थांनी आपले पैसे कोपरगावच्या सातभाई मर्चंट बँकेत ठेवले होते. मात्र, बँकेच्या संचालकांनी आपल्या जवळच्या लोकांच्या नावावर लाखो रूपयांचे कर्ज घेऊन त्याची परतफेड केलीच नाही. ही बँक डबघाईला आल्यानंतर या बँकेत ठेवी ठेवलेले सर्वसामान्य ठेवीदार अडचणीत सापडले आहेत. अनेकांनी आपली पुंजी या बँकेत ठेवली होती. मात्र, संचालकांच्या या भ्रष्टाचारामुळे ठेवी ठेवणाऱया पतसंस्थां आणि सर्वसामान्य नागरिकांना आजवर बँकेचे उंबरठे झिझवावे लागत आहेत.