महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सरपंच निवडीचा कायदा येत्या अधिवेशनात मंजूर करणार - ग्रामविकास मंत्री

थेट सरपंच निवडणूक पद्धत रद्द करुन ग्रामपंचायत सदस्यांच्या मतदानाद्वारेच सरपंच निवडण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने 28 जानेवारीला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला होता.

hasan mushrif
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

By

Published : Feb 21, 2020, 3:08 PM IST

अहमदनगर - सरपंचाची निवड जनतेतून करण्याऐवजी ग्रामपंचायत सदस्यांमधून करण्याचा ठाकरे सरकारने काढलेला अध्यादेश मंजूर करण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नकार दिला होता. त्यानंतर आता हा कायदा येत्या अधिवेशनामध्ये मंजूर करणार असल्याचे सुतोवाच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मात्र, राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन सरपंच परिषदेने केले होते.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची सरपंच निवडीवर प्रतिक्रिया

ABOUT THE AUTHOR

...view details