महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यपालांच्या निर्णयाचे सरपंच परिषदेकडून स्वागत - सरपंच परिषद

जनतेमधून थेट सरपंच निवडण्याचा निर्णय रद्द केल्यानंतर पूर्वीप्रमाणेच सरपंच निवडण्यासाठी अध्यादेश काढावा, ही ठाकरे सरकारने केलेली शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फेटाळली आहे. सरपंच परिषदेच्या वतीने राज्यपालांच्या या भूमिकेचे स्वागत करण्यात आले.

sarpanch-parishad
सरपंच परिषद

By

Published : Feb 21, 2020, 6:12 PM IST

अहमदनगर - सरपंचाची निवड जनतेतून करण्याऐवजी सदस्यांतून करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. याबाबत अध्यादेश मंजूर करण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी नकार दिला आहे. राज्याच्या सरपंच परिषदेच्या वतीने राज्यपालांच्या या भूमिकेचे स्वागत करण्यात आले.

राज्यपालांच्या निर्णयाचे सरपंच परिषदेकडून स्वागत

सरपंच परिषदेच्यावतीने काही दिवसांपूर्वीच राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. सरपंचाची निवड थेट जनतेतून व्हावी अशी मागणी या भेटीत राज्यपालांना केली जाणार होती. त्यापूर्वी राज्यपालांनीच सरकारचा अध्यादेश मंजूर करणार नकार दिल्याने परिषदेच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

हेही वाचा -राज्यपाल-ठाकरे सरकारमध्ये संघर्षाची ठिणगी; 'हा' निर्णय ठरला कारणीभूत

राज्यपालांनी सरकारचा निर्णय फेटाळल्याने आता सरकारला हे विधेयक येणाऱ्या अधिवेशनात विधानसभेत मांडावे लागेल. सरकारने अधिवेशनात हे विधेयक आणल्यास त्याला सरपंच परिषद कडाडून विरोध करेल असा इशारा सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष अनिल गीते यांनी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details