महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Aug 6, 2019, 10:35 AM IST

Updated : Aug 6, 2019, 2:50 PM IST

ETV Bharat / state

गोदावरीच्या पुराचा श्रीक्षेत्र सराला बेटला फटका.. चाहरी बाजूंने पाण्याचा वेढा

पुरामुळे कोपरगाव तालुक्यातील योगीराज गंगागिरी महाराज व ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांचे समाधी स्थळ असलेल्या श्रीक्षेत्र सराला बेटाला फटका बसला आहे.

सरला बेटला चाहरी बाजूंने पाण्याचा वेढा

शिर्डी-गोदावरी नदीला पुर आला आहे. पुरामुळे कोपरगाव तालुक्यातील योगीराज गंगागिरी महाराज व ब्रह्मलीन नारायणगिरी महाराज यांचे समाधी स्थळ असलेल्या श्रीक्षेत्र सराला बेटाला फटका बसला आहे. सराला बेटाच्या दोन्ही बाजूंनी वेढा पाण्याचा बसला आहे.

सरला बेटला चाहरी बाजूंने पाण्याचा वेढा

महंत रामगिरी महाराज यांचेसह मधु महाराज, विद्यार्थी , कामगारांसह सुमारे शंभर भाविक या सराला बेटावर अडकुन पडले होते. पाणी वाढण्याआधी या सर्वांना बेट सोडुन जाण्याची विनंती प्रशासनाने केली होती. मात्र, बेटावर तब्बल 200 गाई आहेत. तसेच या ठिकाणी अखंड विणा वादनाची परंपरा आहे. त्यामुळे बेटावरील सर्वाना बाहेर पडणे शक्य नव्हते. त्यात बुधवार पासुन येवला तालुक्यात शेकडो वर्षाची परंपरा असलेला अखंड हरीनाम सप्ताह सुरु होणार आहे. तेथे महंत रामगीरी यांना जाणे आवशक असतांनाही बेटावरुन बाहेर पडण्यास प्रशासनाने कोणतीही मदत देवु केली नाही. अखेर आज दुपारी मठा कडे असलेल्या बोटीतुनच धाडस करत महारांजांनी नदीचा काठ गाठला. यावेळी उपस्थीत भक्तांनी प्रशासना विरोधात घोषणा दिल्या. महंत रामगीरी यांनी या प्रशासनाच्या भुमिकेचा करत नाराजी व्यक्त केली आहे.

Last Updated : Aug 6, 2019, 2:50 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details