महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे अहमदगरमध्ये स्वागत, वारकऱ्यांना महाप्रसादाचे वाटप - ahemndnagar

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज अहमदनगर जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले.

निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे अहमदगरमध्ये स्वागत

By

Published : Jun 25, 2019, 7:32 PM IST

अहमदनगर - संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज अहमदनगर जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथे पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने वारकरी दिंडीत सहभागी झाले होते.

निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे अहमदगरमध्ये स्वागत

टाळ वाजे, मृदंग वाजे, वाजे हरीची वीणा...निवृत्तीनाथ महाराज निघाले पंढरपुरा.. मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा असा हरिनामाचा गजर करत संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे आज अहमदनगर जिल्ह्यात आगमन झाले. यावेळी काकडवाडी येथील ग्रामस्थांनी वारकऱ्यांचे स्वागत केले. तसेच ग्रामस्थांनी वारकऱ्यांना पिठले, बाजरीची भाकरी, आमटी अशा महाप्रसादाचे भोजन दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details