अहमदनगर -नुकतेच केंद्राच्या आरोग्य विभागाने आदेश काढून उपायापेक्षा अपायकारक ठरू शकणारे आणि कुठलाही शास्त्रीय आधार नसल्याचे सांगत सॅनिटायझेशन टनेल, डोम, व्हॅन बंद करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत. अजूनही अनेक ठिकाणी असे सॅनिटायझेशन टनेल, डोम, व्हॅन सुरूच असल्याचे चित्र आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागानेही यावर जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी, महापालिका यांना सूचना काढलेली असताना अहमदनगरमध्ये मात्र जिल्हा शासकीय रुग्णालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय आदी ठिकाणी या पद्धतीची सॅनिटायझेशन सुविधा सुरू दिसून आली.
आरोग्य विभागाने सूचना देऊनही अनेक ठिकाणी सॅनिटायझेशन टनेल, डोम, व्हॅन सुरूच! - news abot corona
आरोग्य विभागाने आदेश काढून सॅनिटायझेशनद्वारे उपायापेक्षा अपाय जास्त असल्याने असे सॅनिटायझेशन टनेल, डोम, व्हॅन बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, अनेक ठिकाणी सॅनिटायझेशन टनेल, डोम, व्हॅन सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
सार्वजनिक ठिकाणी जाताना कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. त्यात सॅनिटायझेशन टनेल, डोम, व्हॅन अनेक शासकीय कार्यालये, रुग्णालये, महापालिका आदी ठिकाणी उभे करण्यात आले आहेत. याबाबतच्या कौतुकाच्या बातम्याही अनेक ठिकाणी झळकल्या. मात्र, केंद्राच्या आरोग्य विभागाने याबाबत नव्याने आदेश काढून या फवारणी पद्धतीच्या सॅनिटायझेशनद्वारे उपायापेक्षा अपाय जास्त असल्याने असे सॅनिटायझेशन टनेल, डोम, व्हॅन बंद करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या आहेत. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांना विचारले असता त्यांनी सॅनिटायझेशन टनेल, डोम, व्हॅन बंद करणार असल्याचे स्पष्ट केले. सॅनिटायझेशनच्या या पद्धतीमुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. असे असले तरी मंगळवारी दुपारपर्यंत तरी सॅनिटायझेशन टनेल, व्हॅनचा वापर होताना अनेक ठिकाणी पहावयास मिळाला.