महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चाक खड्ड्यात गेल्याने संगमनेर-कसारा बसचा अपघात; चालकाच्या सावधानतेमुळे अनर्थ टळला - संगमनेर-कसारा बसचा अपघात

समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवताना संगमनेर आगाराच्या संगमनेर-भंडारदरा- कसारा या बसचा भंडारदरा काॅलनीजवळ अपघात झाला. यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या बसमध्ये 70 प्रवासी थोडक्यात बचावले असून बसचालकाच्या सावधानतेमुळे होणारा मोठा अनर्थ टळला.

संगमनेर-कसारा बसचा अपघात

By

Published : Oct 30, 2019, 3:12 PM IST

शिर्डी- सकाळी संगमनेर-कसारा या बसचा अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरात अपघात झाला. सकाळी साडेआठ वाजता ही बस (एमएच 14 बीटी 3830) संगमनेरकडून कसाऱ्याकडे जात असताना बसचे चाक खड्ड्यात गेल्याने गाडी शेजारील डोंगराच्या दिशेने पडली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असून या बसमध्ये सुमारे 70 प्रवासी होते. हे सर्व प्रवासी चालकाच्या प्रसंगावधानामुळे बचावले आहेत.

संगमनेर-कसारा बसचा अपघात

हेही वाचा -सरकार स्थापनेवेळी शिवसेना आमच्यासोबत राहील - रावसाहेब दानवे

अकोले तालुक्यातील रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असल्याने अनेकवेळा बसचा अपघात झाला आहे. आज पुन्हा खड्ड्यांमुळेच हा अपघात झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

रस्त्यांवरील खड्डे

हेही वाचा -मुंबईत भाजप विधिमंडळ नेता निवड बैठक; काय असणार उद्धव ठाकरेंची भूमिका?

समोरून येणाऱ्या दुचाकीला वाचवताना संगमनेर आगाराच्या संगमनेर-भंडारदरा- कसारा या बसचा भंडारदरा काॅलनीजवळ अपघात झाले. यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या बसमध्ये 70 प्रवासी थोडक्यात बचावले असून बसचालकाच्या सावधानतेमुळे होणारा मोठा अनर्थ टळला. यावेळी बसचालक अे. सी. कोरडे. हे होते, तर वाहक संतोष घुले हे होते.

ABOUT THE AUTHOR

...view details