महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची संगमनेर भेट सदैव प्रेरणादायी - आमदार डॉ.सुधीर तांबे - mahatma gandhi visit

21 मे 1921 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संगमनेर शहरास भेट दिली. त्यावेळी संगमनेर शहरात मुक्कामही केला.संगमनेर हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक ,इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू या राष्ट्रपुरुषांनी शहरास भेट दिली आहे. या सर्व भेटी या शहराचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा समृद्ध व संपन्न करणा-या आहेत.

राष्ट्रपिता महात्मा गांधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी

By

Published : May 23, 2021, 11:03 AM IST


संगमनेर- भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात जनजागृती करण्यासाठी संगमनेर शहरात दिलेली भेट ही संगमनेर मधील सर्व नागरिकांसाठी सदैव संस्मरणीय व प्रेरणादायी असल्याचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे म्हणाले.संगमनेरबाजारपेठ, गांधी चौक येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी शहरास भेट देऊन आज शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांना अभिवादन करण्यात आले, यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे व इतर मान्यवर उपस्थित होते.

शहराचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा समृद्ध व संपन्न
यावेळी आ. डॉ. तांबे म्हणाले की, 21 मे 1921 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी संगमनेर शहरास भेट दिली, त्यावेळी संगमनेर शहरात मुक्कामही केला.संगमनेर हे ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले शहर आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक ,इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू या राष्ट्रपुरुषांनी शहरास भेट दिली आहे. या सर्व भेटी या शहराचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा समृद्ध व संपन्न करणारा आहे. यातून संगमनेर तालुक्यासाठी सदैव प्रेरणा मिळत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यलढ्यात संगमनेरमध्ये केलेले प्रबोधन हे सर्वांसाठी अतिशय अभिमानास्पद आहे. सत्य व अहिंसेचा संपूर्ण जगाला मूलमंत्र देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर तरुणांनी काम केल्यास भारत देश आणखी मजबूत होऊन महासत्तेकडे निश्चित वाटचाल करेल. आज संगमनेर शहर व तालुका महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक, सहकार, ग्रामीण विकास ,आर्थिक समृद्धी,मोठी बाजारपेठ अशा विविध क्षेत्रात राज्यात अग्रगण्य आहे. अशीच समतेची व विकासाची वाटचाल सदैव कायम ठेवत समाजातील सर्व घटकांसाठी काम करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध राहावे असे आवाहनही त्यांनी केले.

नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे म्हणाल्या की , सर्व संगमनेर शहरवासीय व तालुक्यासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असलेल्या महात्मा गांधीजी यांच्या भेटीस आज शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. अनेक स्थित्यंतरे झाली मात्र राष्ट्रीय एकात्मतेचे विचार देणाऱ्या सर्व राष्ट्र पुरुषांचे विचार आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. यावेळी त्यांनी 1921 मध्ये संगमनेर मधील नागरिकांच्या वतीने भारतरत्न महात्मा गांधी यांना दिलेल्या मानपत्राचे वाचन ही केले .

हेही वाचा-ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारला पंजाब पोलिसांनी केली अटक; हत्येचा आहे आरोप

ABOUT THE AUTHOR

...view details