अहमदनगर- संगमनेर तुरुंगातून पळालेल्या २ आरोपींना अवघ्या काही तासातच पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास तुरुंगाच्या खिडकीचे गज कापून पलायन केले होते. विशाल दत्तात्रय तांदळे (वय २२) आणि कलीम अकबर पठाण (वय २०), अशी आरोपींची नावे आहेत.
तुरुंगातून पलायन केलेल्या आरोपींना पकडण्यात संगमनेर पोलिसांना यश
आरोपी विशाल आणि कलीम यांना एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यांना संगमनेर तुरुंगात ठेवले होते. मात्र, त्यांनी शुक्रवारी पहाटे तुरुंगाचे गज कापून पलायन केले.
संगमनेर पोलीस ठाणे
आरोपी विशाल आणि कलीम यांना एका गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्यांना संगमनेर तुरुंगात ठेवले होते. मात्र, त्यांनी शुक्रवारी पहाटे तुरुंगाचे गज कापून पलायन केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी शोधाशोध सुरू केली. काही तासातच आरोपी संगमनेरजवळील अकोले नाका येथे पकडले गेले.
आरोपी विशाल तांदळे याने यापूर्वीही खिडकीचे गज कापून राजगुरूनगर पोलिसांच्या कोठडीतून पलायन केले होते.