अहमदनगर - प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आज (गुरुवार) संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सरकारी पक्षाला आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. त्यानुसार न्यायमुर्ती डी. एस. घुमरे यांच्यासमोर आज सरकारी पक्ष हजर झाला. त्यानंतर न्यायालयाने या खटल्याच्या पुढील कामकाजासाठी 16 सप्टेंबर ही तारीख दिलेली आहे. त्याच बरोबर आता इंदोरीकर महाराजांच्या विरोधातील या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मुलन समिती देखील आपली भुमिका मांडणार आहे. या प्रकरणाचा पाठपुरवठा करणाऱ्या अॅड. रंजना गवांदे या देखील या खटल्यात सहभागी झाल्या आहेत.
प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी मुलांच्या जन्माविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधात 26 जून रोजी संगमनेर प्रथमवर्ग न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर 7 ऑगस्ट रोजी इंदोरीकर महाराजांना न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यापुर्वीच 4 ऑगस्ट रोजी इंदोरीकर महाराजांनी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. त्याला जिल्हा न्यायालयाने स्थगिती आदेश दिल्याने इंदोरीकरांना दिलासा मिळाला.
हेही वाचा -नरेंद्र दाभोलकर स्मृतीदिन : 'त्यांनी' मारलेली हनुमान उडी म्हणजे...सहकाऱ्यांनी दिला आठवणींना उजाळा