Sangamner Crime : तीन चिमुकल्यासह आईचा मृतदेह आढळला विहिरीत, मृत्यू की आत्महत्या गूढ कायम - संगमनेर क्राईम न्यूज
कोठे खुर्द गावांतर्गत असलेल्या खांडगेदरा येथे बाळासाहेब गणपत ढोकरे, पत्नी स्वाती बाळासाहेब ढोकरे, मुलगी भाग्यश्री बाळासाहेब ढोकरे, तन्वी बाळासाहेब ढोकरे व चिमुकला मुलगा शिवम बाळासाहेब ढोकरे हे सर्वजण राहत आहे. घराशेजारीच असलेल्या विहिरीत स्वाती ढोकरे (वय २८ वर्ष) , भाग्यश्री ढोकरे (वय५ वर्ष), तन्वी ढोकरे (वय साडेतीन वर्षे) व चिमुकला मुलगा शिवम (वय सहा महिने) यांचे मृतदेह ( mother died with three children in Sangamner ) आढळून आले. त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
अहमदनगर -संगमनेर तालुक्यातील पठारभागातील कोठे खुर्द गावांतर्गत असलेल्या खांडगेदरा येथील विहीरीत आईसह दोन मुली व एका चिमुकल्या मुलाचा मृतदेह ( mother died with three children in Sangamner ) आढळून आला आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. कोठे खुर्द गावांतर्गत असलेल्या खांडगेदरा येथे बाळासाहेब गणपत ढोकरे, पत्नी स्वाती बाळासाहेब ढोकरे, मुलगी भाग्यश्री बाळासाहेब ढोकरे, तन्वी बाळासाहेब ढोकरे व चिमुकला मुलगा शिवम बाळासाहेब ढोकरे हे सर्वजण राहत आहे. घराशेजारीच असलेल्या विहिरीत स्वाती ढोकरे (वय २८ वर्ष) , भाग्यश्री ढोकरे (वय५ वर्ष), तन्वी ढोकरे (वय साडेतीन वर्षे) व चिमुकला मुलगा शिवम (वय सहा महिने) यांचे मृतदेह आढळून आल्याने घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.