अहमदनगर :आर्यन खानच्या सुटकेसाठी लाच मागितल्याच्या आरोपा प्रकरणी चर्चेत आलेल्या एनसीबीचे मुंबई क्षेत्राचे माजी संचालक समीर वानखेडे यांनी रविवारी शिर्डीत येऊन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. साईबाबांच्या दर्शनानंतर समीर वानखेडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. चिखल साफ करत असताना काही शिंतोडे तुमच्या उडणार हे लक्षात ठेवले पाहिजे.आरोप- प्रत्यारोप होणे हा आपल्या कामाचा भाग असतो. तो आपण सकारात्मक पद्धतीने घेतला पाहिजे. आमची भावना फक्त राष्ट्राकडे आहे. जर चूक झाली असेल तर आपण ती सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आरोप- प्रत्यारोप होणे हे आपल्या कामाचे भाग आहे. ज्यावेळी तुम्ही चिखल साफ करतात, त्यावेळी तुमच्यावर शिंतोडे उडणारच. जी टीका होते ती सकारात्मक पद्धतीने घेतो. जर चूक झाली असेल तर ती सुधारले पाहिजे - समीर वानखेडे.
साईबाबांकडे काय मागितले: साई दर्शानाला आल्यानंतर पत्रकारांनी त्यांनी तुम्ही साई बाबांकडे या मागणी केली असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना समीर वानखेडे म्हणाले. मी साई भक्त असल्याने नेहमीच साईच्या दर्शनासाठी येत असतो. आपण आज साईबाबांकडे विजयी भव हा आशिर्वाद मागितला असल्याचे म्हटले. समीर वानखेडे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर ह्याही होत्या. साई दर्शनाच्या औचित्यबद्दल बोलताना त्यांनी आमच्यावरचे सगळे विघ्न दूर व्हावेत आणि न्याय व्हावा यासाठी आज साईबाबांच्या चरणी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 22 वर्षापासून साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आम्ही येतोय. मी तर लहानपणापासूनच आई-वडिलांबरोबर दर वर्षाच्या 31 डिसेंबरला साईबाबांच्या काकड आरतीला आम्ही येतो. मात्र आज समीरबरोबर शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याचा योग आला असल्याचे त्या म्हणाल्या.
सत्य आमच्या पाठीशी :ड्रग्स क्रुझ प्रकरणात आर्यन खानला अडकून त्याच्या सुटकेसाठी लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडे यांच्यावरती आहे.याप्रकरणात सीबीआयने चौकशी सुरू करत आहे. दरम्यान सीबीआयने अटक करून नये असा दिलासा उच्च न्यायालयाने समीर वानखेडे यांना दिला आहे. आर्यन खान प्रकरणामुळे समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर विविध आरोप केले जात आहेत. याविषयी बोलताना क्रांती रेडकर म्हणाल्या की, समीर वानखेडे यांचे योद्धावाले स्पिरीट आमच्या सर्वांमध्ये उतरले आहे. त्यामुळे कितीही काही झाले तरी लढत राहायचे. कितीही आरोप झाले तरी लढत राहायचे आहे. या आधीही दीड वर्षापूर्वी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यावेळी समीर वानखेडे विजयी झाले होते. कितीही केसेस होऊ द्या आणि सत्य आमच्या पाठीशी आहे.