शिर्डी /अहमदनगर :यंदा १ जानेवारी ते २६ डिसेंबर दरम्यान संस्थानला सर्व प्रकारे एकुण ३९४ कोटी २८ लाख ३६ हजार देणगी मिळाली आहे. ३१ डिसेंबर पर्यंतच्या ( Saicharani Donates 400 Crores in a Year ) देणगीसह हा आकडा चारशे कोटींचा विक्रमी टप्पा पार करण्याची चिन्हे ( An Average of More Than One Crore Donations ) आहेत. २६ डिसेंबर पर्यंत प्राप्त झालेल्या देणगीचा तपशील-दक्षिणा पेटी- १६५ कोटी ५५ लाख, ( One Crore Donations Per Day ) देणगी कांऊटर- ७२ कोटी २६ लाख २७, डेबीट व क्रेडीट कार्ड-४० कोटी ७४ लाख, ऑनलाईन देणगी- ८१ कोटी ७९ लाख, चेक व डीडी- १८ कोटी, ६५ लाख व मनीऑर्डर- १ कोटी ८८ लाख रुपये. याशिवाय सोने- २५ किलो ५७८ ग्रॅम (११ कोटी ८७ लाख), चांदी- ३२६ किलो ३८ ग्रॅम(१ कोटी ५१ लाख). साईसंस्थानचे विदेशी चलन खात्याचा परवाना रिन्युएशन करणे प्रलंबीत असल्याने कोट्यावधी रुपयांचे विदेशी चलन पडून आहे. दरवर्षी या माध्यमातुनही पंधरा ते वीस कोटी रुपयांची देणगी मिळत असते.
Sai Donates 400 Crores : साईचरणी वर्षभरात चारशे कोटींचे दान; रोज सरासरी एक कोटीपेक्षा अधिक देणगी
यंदाच्या वर्षभरात भाविकांनी साईचरणी जवळपास चारशे कोटींचे दान ( Saicharani Donates 400 Crores in a Year ) अर्पण केले आहे. दानपेटीत ( An Average of More Than One Crore Donations ) आज सर्व प्रकारच्या ( One Crore Donations Per Day ) देणग्यांसह रोज एक कोटींहून अधिक दान येत आहे.
पहिल्या वर्षी भाविकांकडून २२३८ रूपये वर्गणीसंस्थान स्थापनेनंतर पहिल्या वर्षी १९२२ मध्ये भाविकांकडून २२३८ रूपये वर्गणी आली तर कायम फंडासाठी ३७०९ रूपये जमा झाले. १९३६ च्या जानेवारीत ६५ तर फेब्रुवारीत बाहेरून केवळ २५ भाविक दर्शनाला आल्याची नोंद आहे. फेब्रुवारीत दानपेटीत केवळ ४३ रूपये निघाले, त्यातील रोज एक या प्रमाणे २९ रूपये संस्थाननेच टाकले होते. शंभर वर्षानंतर आज रोज एक कोटींपेक्षा अधिक दान येते व संस्थानच्या तिजोरीत ४७० कोटींच्या ठेवी, ४३० किलो सोने व ६ हजार किलो चांदी आहे.
राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्तीतही संस्थान करते मदतराहुल जाधव, सीईओ, साईसंस्थान भाविकांकडून मिळालेल्या देणगीतुन संस्थान विविध भक्तोपयोगी व समाजोपयोगी कामे करते. साईसंस्थानचे साईनाथ रूग्णालयात निशुल्क तर साईबाबा रूग्णालयात माफक दरात वैद्यकीय उपचार करण्यात येतात. मोठ्या आजारांसाठी गोरगरीब रूग्णांना वैद्यकीय अनुदान देण्यात येते. प्रसादालयात मोफत अन्नदान करण्यात येते. वर्षाकाठी जवळपास दिड कोटी भाविक याचा लाभ घेतात. संस्थानच्या शैक्षणिक संकुलात सहा हजार विद्यार्थी नाममात्र दरात ज्ञानार्जन करत आहेत. भाविकांना माफक दरात निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. राष्ट्रीय व नैसर्गिक आपत्तीतही संस्थान मदत करते. संस्थानात जवळपास सहा हजार कर्मचारी आहेत.